दिगंबर शिंदे

चालुक्य सम्राट विक्रमादित्यच्या कालखंडातील बाराव्या शतकामध्ये शिवमंदिरासाठी दहा मत्तर (मोजणीचे तत्कालीन एकक) जमीन दान दिल्याचा शिलालेख जत तालुक्यातील मल्लाळ डोंगरावर उजेडात आला आहे.

Torrential rain with hail in Shirol and Hatkanangle taluka
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती
heart attack in the swimming pool
धक्कादायक! ‘स्विमिंग पूल’मध्येच हृदयविकाराचा झटका
Bhandara, Youth Murdered, Body Burn, Destroy Evidence, Enmity, garada village, lakhani taluka, police, crime news, marathi news,
भंडारा : वैमनस्यातून तरुणाची हत्या; पेट्रोल टाकून जाळला मृतदेह…..
In Ralegaon taluka a young man and an old man were killed in Nepal
राळेगाव तालुक्यात रक्तरंजीत होळी; नेपाळच्या तरुणासह वृद्धाची हत्या

जिल्ह्याचे ऐतिहासिक संदर्भ समजण्यासाठी हा सर्वात पुरातन शिलालेख असून जमीन नांगरट करीत असताना हा शिलालेख उजेडात आल्याची माहिती प्रा. गौतम काटकर आणि इतिहास संशोधक मार्नंसग कुमठेकर यांनी दिली.

बाराव्या शतकामध्ये इसवी सन ११२० मध्ये एका शिवमंदिरासाठी जतचा प्रमुख दंडनायक बंकेय याने मल्लाळ येथील दहा मत्तर जमीन दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे. या शिलालेखातून चालुक्यसम्राट विक्रमादित्य याच्या कारकिर्दीतील नवी माहिती उजेडात आली आहे.

जत तालुक्याच्या विविध गावात चालुक्य, कलचुरी, यादव यांच्या राजवटीतील शिलालेख आढळून आले आहेत. मल्लाळ येथील डोंगरावर दीपक माने यांची जमीन नांगरत असताना भगवान काळे यांना एक मोठा दगड आढळून आला. या दगडावर शिर्वंलग, गाय-वासरू, कट्यार, सूर्य चंद्राचे शिल्पांकन आहे. खालील बाजूस ‘हळे कन्नड’ लिपीतील मजकूर होता.

या शिलालेखाचे वाचन हंपी येथील कन्नड विद्यापीठाचे शिलालेखशास्त्रा विभागाचे प्रमुख डॉक्टर कलवीर मनवाचार यांनी करून दिले. या वाचनासाठी महेंद्र बोलकोटगी (जमगी) यांचेही सहकार्य लाभले. या शिलालेख अभ्यासासाठी सागर कांबळे, विलास हराळे, बिराप्पा बंडगर, कल्लापा माने यांचीही मदत झाली.

मल्लाळ येथे सापडलेल्या या शिलालेखात चालुक्य विक्रम शक ४५ शार्वरीनाम संवत्सरे, भाद्रपद शुद्ध पंचमी सोमवार या दिवशी जत येथील प्रमुख दंडनायक बंकेय याने शिव मंदिरासाठी १० मत्तर जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. हा लेख १ ऑगस्ट सन ११२० रोजी लिहिला गेला आहे.

या विभागाचा प्रमुख अधिकारी असलेल्या दंडनायक बंकेय याच्या नावाने जतमधील शिवमंदिराला बंकेश्वार या नावाने आजही ओळखले जाते.

राजा विक्रमादित्यचा उल्लेख

या शिलालेखात चालुक्य राजा विक्रमादित्य याचा उल्लेख आला आहे. या काळात त्याच्या राज्याच्या सीमा गुजरातपासून दक्षिणेत तामिळनाडू पर्यंत भिडल्या होत्या. चालुक्य सम्राट विक्रमादित्य याने आपल्या राज्यारोहणानिमित्त स्वतङ्मच्या नावाचा चालुक्य विक्रम शक सुरू केला. कराडच्या शिलाहार राजवंशातील चंदलादेवी ही विक्रमादित्याची महाराणी होती. कराडमध्ये झालेल्या स्वयंवरात तिने विक्रम राजाला पती म्हणून निवडले होते.