News Flash

प्रियंका चतुर्वेदींचे काम दिसले, आमचे नाही-चंद्रकांत खैरे

मी यापुढेही कट्टर शिवसैनिकच राहणार असंही चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केलं

प्रियंका चतुर्वेदी यांचे काम दिसले मात्र आमचे काम दिसले नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. मात्र स्मशानात जाईपर्यंत मी शिवसेनेत असणार आहे. मी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलं. आता उद्धव ठाकरेंसोबत काम करतो आहे. त्यांना वाटतं की नवीन लोकांना संधी दिली पाहिजे.

“प्रियंका चतुर्वेदी चांगलं काम करत आहेत. हिंदी बोलतात, इंग्रजीही बोलतात. मी २० वर्षे लोकसभा गाजवली. मला आवश्यकता नव्हती पण माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती. मला अनेक ऑफर होत्या पण इकडे-तिकडे गेलो नाही.” असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे .मला संधी मिळाली असती तर पक्षासाठी आणखी चांगले काम करता आले असते असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरेंना प्रियंका चतुर्वेदी यांचे काम आवडले असेल. त्यामुळे त्यांनी उमेदवारी दिली असेल आम्ही देखील मराठवाड्यासाठी खूप काम केलं. पण आमचे काम त्यांना दिसत नाही. प्रियंका चतुर्वेदी नक्कीच चांगलं काम करतील. तुमची नाराजी तुम्ही पक्षप्रमुखांना सांगणार का? असं विचारलं असता ते म्हणाले, ” मी स्वतःहून त्यांच्याकडे जाणार नाही. मात्र त्यांनी बोलावले तर नक्की जाणार.”

मी याआधी चारवेळा खासदार झालो आहे. मात्र माझ्या मराठवाड्यातील लोकांना अपक्षा होती. मी एक कडवट शिवसैनिक आहे. जनतेची सेवा करत आलो आहे. यापुढेही करेन असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 4:29 pm

Web Title: chandrakant khaire comment priyanka chaturvedi scj 81
Next Stories
1 #Corona: आधीच देशात रोगराई, त्यात अजून एक वाढला तर काय फरक पडतो – राज ठाकरे
2 मध्य प्रदेशपाठोपाठ ‘ऑपरेशन लोटस’ महाराष्ट्रातही होईल का?; महाराष्ट्रातील जनता म्हणते…
3 शिवजयंती तिथीनुसार का साजरी करावी? राज ठाकरेंनी दिलं ‘हे’ उत्तर
Just Now!
X