News Flash

आता तरी सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा, अन्यथा … – चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारला दिला इशारा

संग्रहित

मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप निकाली निघाला नसल्याने या मुद्यावरून आज पुन्हा एकदा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “ सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करून मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांचा हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार त्यांना निश्चितच महागात पडणार आहे. आता तरी सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा. अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला की इतिहास घडतो, हे देशाने पाहिलं आहे.” अशा शब्दांमध्ये त्यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, “राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी पुढाकार न घेतल्यामुळे मराठा तरूणांचा खेळखंडोबा करून ठेवलाच आहेच. मात्र आता त्यांनी मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. २०२०-२१ या शैक्षिणक वर्षातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे नोटिफिकेशन ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. याशिवाय मराठा आरक्षण EWS अंतर्गत देण्याचे आश्वासनदेखील दिले होते. मात्र त्यांनी मराठा तरूणांचा विश्वासघात केला आहे. या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी SEBC प्रवर्गाचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही आणि इतर आरक्षित असलेल्या सर्व प्रवर्गांचा उल्लेख करण्यात आला आहे, ही अतिशय धक्कादायक बाब आहे.”

तसेच, “अकरावी, अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा सर्वच प्रक्रिया रखडल्या आहेत. मराठा तरूणांचं भवितव्य अंधारमय होत चाललं आहे. मात्र बिकामी राज्य सरकारला याची किंचितसुद्धा पर्वा नाही. राज्य सरकारच्या या धोरणांमुळे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही, हे सिद्ध होतंय!” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 3:53 pm

Web Title: chandrakant patil criticizes the state government on the issue of maratha reservation msr 87
Next Stories
1 पाणीपुरीसाठी शौचालयाच्या टाकीतील पाण्याचा वापर, कोल्हापूरकरांनी फोडली गाडी
2 …म्हणूनच उर्मिला मातोंडकरांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी
3 आता ‘या’ विद्यार्थ्यांनाही मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ; धनंजय मुंडेंची माहिती
Just Now!
X