News Flash

चंद्रपुरात लोखंडी हातोड्याने वार करून वडिलांकडून मुलाची हत्या

हत्येनंतर स्वतः केले आत्मसमर्पण

(संग्रहित छायाचित्र)

घरगुती कलह विकोपाला गेल्यानंतर जन्मदात्या वडिलांकडून मुलाची हत्या झाल्याची घटना चंद्रपुरात घडली आहे. हत्या केल्यानंतर स्वतः वडिलांनी पोलिसांत जाऊन आत्मसमर्पण केलं आहे. बल्लारपूर येथील विद्यानगर वॉर्डात ही थरारक घटना सकाळी घडली. राहुल सोपान नगराळे (वय ४२) असं मृतकाचे नाव आहे तर सोपान नगराळे (वय ७४) असे आरोपी पित्याचे नाव असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांनी दिली.

मुलगा राहुल याला दारूचे व्यसन होते. मद्यधुंद अवस्थेत तो कुटुंबातील लोकांना सतत त्रास देत होता. मुलाच्या सततच्या या त्रासाला कंटाळून शनिवारी सकाळी झोपेत असलेल्या राहुलच्या डोक्यावर जन्मदात्या पित्यानेच लोखांडी हातोडीने घाव घालून जागीच ठार केले

स्वतःच्या लहान मुलीसह आईवडील यांनाही त्रास देत होता. त्यामुळे विवंचनेत वडील सोपान नगराळे यांनी मुलाचा खून केला. त्यानंतर घराबाहेर निघून मुलाची हत्या केल्याचे शेजारच्या लोकांना सांगत पोलिस स्टेशन गाठलं. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 5:22 pm

Web Title: chandrapur angry father killed a drunken son nck 90
Next Stories
1 अजित पवारांना निर्दोषत्व देण्याचा निर्णय भाजप सरकारचा!
2 भावनांच्या कल्लोळाचे हृदयस्पर्शी सादरीकरण!
3 अर्थसंपन्न आरक्षित वर्गाला आरक्षण कशाला हवे?
Just Now!
X