चंद्रपूर

करोना संक्रमण काळामध्ये पोलीस दलाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी पोलीस योद्धा उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते आज करण्यात आला. या उपक्रमात ४०० युवक सहभागी झाले आहेत. भरोसा सेल या उपक्रमात पीडित, महिला व बालके यांच्याकरिता एकाच छताखाली समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचादेखील त्यांनी यावेळी शुभारंभ केला. ‘पोलीस मैदानावर’ हा कार्यक्रम सोमवारी चंद्रपूरात आयोजित करण्यात आला होता. पोलिस योद्धा म्हणून सहभागी झालेल्या युवकांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पोलीस योद्ध्यांची कीट देण्यात आली. या किटमध्ये टी-शर्ट, आयकार्ड तसेच सुरक्षेविषयीच्या वस्तू देण्यात आलेल्या आहेत.

dewendra fadanvis
आमचा प्रवक्ताही चर्चेत पाणी पाजेल…; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना…
fast by AAP, AAP Kolhapur
केजरीवालांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आपतर्फे सामूहिक उपोषण
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

कोरोना संसर्गकाळात पोलीस विभागाने पोलीस योद्धा उपक्रमाद्वारे युवकांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे. युवकांनी पोलीस योद्धा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील पीडित महिला व बालके यांना आधार देण्याचे काम भरोसा सेलद्वारे होणार असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाला नाकाबंदी, बंदोबस्तापासून ते कोविड केअर सेंटरवरील बंदोबस्तापर्यंत साऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. पोलीस विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी पोलीस योद्धा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील युवकांना पोलिसांसोबत १५ दिवस काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत यामध्ये ४०० युवकांनी सहभाग नोंदवला आहे.

आणखी वाचा- शासनाकडून देय असलेली शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करू नये : वड्डेटीवार

जिल्ह्याातील पीडित महिला व बालके यांच्या समस्या अडचणी सोडविण्यासाठी ‘भरोसा सेल’ही पोलीस विभागाने सुरू केलेला आहे. या भरोसा सेल उपक्रमांतर्गत पीडित महिला व बालके यांना एकाच छताखाली समुपदेशन मार्गदर्शन केले जात आहे. घरगुती हिंसा, कौटुंबिक समुपदेशन, वादविवाद मिटविण्यासाठी तज्ञ सल्लागाराद्वारे समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच जिल्हा स्तरावर संरक्षण अधिकारी नेमलेले असून २४ तासाच्या आत दोषींवर कारवाई करणे शक्य होत आहे. आज झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही योजनेत सहभागी प्रातिनिधिक लोकांना कीटचे वाटप व सत्कार करण्यात आला.