News Flash

चंद्रपूर: रानडुक्करानं कारला धडक दिल्याने विचित्र अपघात; एक ठार, पाच जखमी

धडक इतकी जबर होती की ही कार मुख्य मार्गावरुन लांब फेकली गेली.

संग्रहित छायाचित्र

राजुरा येथील चनाखा या गावच्या मार्गावर रानडुकरानं कारला जबर धडक दिल्याने एकाच कुटुंबातील एक जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. धडक इतकी जबर होती की ही कार मुख्य मार्गावरुन लांब फेकली गेली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मोतीराम आत्राम असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना राजूरा तालुक्यातील चनाखा मार्गावर मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी चंद्रपुरला हलवण्यात आलं आहे.

राजुरा तालुक्यात येणाऱ्या कविठपेठ येथील मोतीराम विठू आत्राम हे आपल्या परिवारासह राजुरा येथील रवि कोडापे या नातेवाईकाकडे गेले होते. मंगळवारला रात्री उशिरा कोडापे यांच्या कारने आत्राम कुटुंबिय आपल्या गावाकडे निघाले. कारमध्ये मोतीराम आत्राम, साधना आत्राम, रुणाली आत्राम, समिक्षा आत्राम बसले होते. तर रवी कोडापे कार चालवित होते.

चनाखा गावाजवळ अचानक झूडपातून आलेल्या रानडुकराने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कार मार्गावरुन लांब फेकली गेली. यात मोतीराम आत्राम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर इतर पाच जण गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती विरुर पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी चंद्रपूरला हलवले. पुढील तपास विरुर पोलीस करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 4:30 pm

Web Title: chandrapur big accident happened when the boar hit a car one killed five injured aau 85
Next Stories
1 चंद्रपूर: करोनासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन; महापालिकेचा कारवाईतून दीड लाखांचा दंड वसूल
2 खळबळजनक : नांदेडमधून पंजाबमध्ये परतलेल्या यात्रेकरूंपैकी ७९५ जण निघाले करोना पॉझिटिव्ह
3 कल्याण-डोंबिवली पालिकेच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती
Just Now!
X