News Flash

चंद्रपूर – वरोरा शहरात व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या!

डोक्यावर व गळ्यावर धारदार शस्त्रांने वारही केले

महिलेला २००६ पासून ५० वेळा अटक करण्यात आल्याची माहिती नव्या प्रकरणामुळे समोर आली आहे. महिलेला २,५०० डॉलर्स चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे.

चंद्रपुरमधील वरोरा येथे अंबादेवी वार्डातील व्यावसायिक शेख आबिद शेख (३२) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी शेख आबिद शेख याला गोळ्या घातल्या व ते घटनास्थळावरून पसार झाले. मृत शेख आबिद शेक हा बकरी व कोंबडी पालनचा व्यवसाय करायचा, याचबरोबर सट्टा व जुगाराचा धंदा देखील धंदा होता. हल्लेखोरांनी आबिदच्या डोक्यावर व गळ्यावर धारदार शस्त्रांने वार केले होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला असून, पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत. तसेच, आबिदची हत्या कोणत्या कारणाने झाली याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 9:33 pm

Web Title: chandrapur businessman shot dead in warora msr 87
Next Stories
1 ‘तौते’ वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील ५ तालुक्यांमध्ये संचारबंदी!
2 “देशाचं रूपांतर स्मशानभूमीत करणाऱ्या पंतप्रधान मोदींना पत्र लिहण्याचे धाडस फडणवीसांनी करावं”
3 Cyclone Tauktae : किनारपट्टीवर ६२, तर खाडीवरील ११५ गावांना सतर्कतेचा इशारा; समुद्र किनारे बंद
Just Now!
X