चंद्रपूरमधील राजुरा येथील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार सुभाष धोटे, त्यांचे भाऊ नगराध्यक्ष अरुण धोटे यांना अटक करण्यात आली. मद्यधूंद अवस्थेत नर्सिंग कॉलेजमधील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

सुभाष धोटे आणि अरुण धोटे संचलित कल्याण नर्सिग कॉलेज असून पीडित तरुणी या कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकत आहे. कॉलेजचे प्राचार्य तिचा मानसिक छळ करत होते. याविरोधात तिने संस्थाचालकांकडे तक्रार दिली होती. मात्र, संस्थाचालक सुभाष धोटे यांनी पीडितेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. २९ ऑक्टोबर २०१८ रोजी वसतीगृहाच्या प्रांगणात प्राचार्य व अन्य दोन जणांनी तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला होता. याविरोधात पीडित तरुणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास गेली असता अरुण धोटे यांनी जबरदस्तीने पीडितेला तिथून उठवले आणि सुभाष धोटे यांच्या घरी नेले. सुभाषण धोटे यांनी पीडितेला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पीडित तरुणीने सोमवारी पोलिसांकडे तक्रार दिली. अखेर पोलिसांनी सोमवारी रात्री धोटे बंधूंना अटक केली.

Congress News
काँग्रेसला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यावर निवडणूक आयोगाकडून प्रचारबंदीची कारवाई
chandrapur, Tension Erupts Teli Samaj prograame, Teli Samaj Felicitation progrrame, Congress Leaders Declare Support, Controversy Ensues, pratibha dhanorkar, chandrapur news, lok sabha 2024,
चंद्रपूर : निमंत्रण सत्कार सोहळ्याचे, पाठिंबा काँग्रेसला….वास्तव कळताच धक्काबुक्की….
solapur lok sabha, bjp candidate ram satpute
सोलापुरात गुढी पाडव्याच्या शोभायात्रेत भाजप व काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने; तुंबळ घोषणा युद्ध
Congress manifesto for Lok Sabha election 2024 will be announced and campaign will be done across the country regarding 25 promises
काँग्रेसचीही ‘घरघर हमी’! पंचसूत्रीतील २५ आश्वासनांबाबत देशभर प्रचार