News Flash

कालव्यात बुडून ७५ वर्षीय इसमाचा मृत्यू

शेतकऱ्यांनी सकाळी पाहिला कालव्यातून वाहताना मृतदेह

चंद्रपूर

ब्रम्हपुरी तालुक्यातील चौगान येथील रहिवासी असलेल्या एका इसमाचा मृतदेह गावाजवळून वाहत असलेल्या गोसेखुर्दच्या कालव्यात वाहताना दिसल्याने एकच खळबळ उडाली. भीमक चौधरी असे त्या इसमाचे नाव असून ते ७५ वर्षांचे होते. बुधवारी सकाळी ११च्या सुमारास त्यांचा मृतदेह कालव्यातून वाहताना शेतकऱ्यांना दिसला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

भीमक हे मंगळवारी (२१ जुलै) सकाळी ९ वाजेपासून घरातून अचानक निघून गेले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारपासूनच त्यांचा परिसरात सर्वत्र शोध घेतला, मात्र ते कुठेही सापडले नाहीत. आज दुपारी १ वाजता रानबोथली ते जवराबोळी मेंढा दरम्यान वाहत असलेल्या गोसेखुर्दच्या कालव्यात भीमक यांचा मृतदेह परिसरातील शेतकऱ्यांना दिसला. त्यांनी ही माहिती भीमक यांच्या कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत खात्री केली आणि याची माहिती ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला कळवली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व अकस्मिक मृत्यूची नोंद केली. सध्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे शव नेले असून नक्की घटना कशी घडली असावी याचा तपास पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 7:41 pm

Web Title: chandrapur dead body of 75 years old man found in canal vjb 91
Next Stories
1 सोलापुरात केवळ ५१४ करोनाबाधितांनाच महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ
2 कळंबमध्ये दुहेरी हत्याकांड, एकमेकांना भोसकल्याने दोन तरूणांचा मृत्यू
3 ‘कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापनाचे’ मॉडेल विकसित, भारतीय पेटंटच्या जर्नलमध्ये मिळाली प्रसिद्धी
Just Now!
X