09 August 2020

News Flash

आता सरपंच करतील ऑनलाईन शिक्षणासाठी जिल्हा प्रशासनाला मदत, चंद्रपूर जिल्ह्यात अभिनव प्रयोग

चंद्रपूर जिल्ह्यात अभिनव प्रयोग

(फोटो : चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले)

करोना विषाणू प्रादूर्भावाच्या काळात जिल्ह्यातील शाळादेखील तूर्तास 31 जुलैपर्यंत बंदच असणार आहे. पण सद्यस्थितीत शाळा जरी सुरु नसल्या तरी मूलांचे शिक्षण सुरु राहीले पाहीजे यासाठी शासनस्तरावरुन अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. मुलांपर्यंत ऑनलाईन माध्यमाद्वारा अभ्यासक्रम पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये आकाशवाणी, टिव्ही. व्हॉटस अ‍ॅप, दिक्षा अ‍ॅप, झूम अ‍ॅप, मोबाइल मेसेजद्वारे संपर्क यांचा प्रामुख्याने समावेश आहे. गावाचे प्रमुख म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पोहचविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सरपंचांना केले आहे.

पालकांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही यासाठी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा स्वीकार करावा, असे आवाहन पालकांना सीईओंनी केले आहे. “मुलांपर्यंत मोफत पाठयपुस्तके शालेय सत्र सुरु होण्यापूर्वीच पोहचविण्यात आलेली आहे. याचाही विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होत आहे. कोणत्याही परिस्थितीत मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहणार नाही. यासाठी शासनस्तरावरुन सुरु करण्यात आलेले उपक्रम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्वांची जबाबदारी आहे”, असे कर्डिले म्हणाले.  जिल्ह्यात सद्यस्थितील पुढील उपक्रम राबविण्यात येत आहे.

दिक्षा अ‍ॅप : विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये या करिता सर्व इयत्ताच्या शालेय अभ्यासक्रमावर आधारीत उत्कृष्ट व्हिडीओज या अ‍ॅपवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. यामध्ये प्रत्येक वर्गासाठी तसेच प्रत्येक विषयासाठी व्हिडीओ उपलब्ध आहेत. दररोज सकाळी इयता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता अभ्यासक्रमावर आधारीत स्मार्टफोनमध्ये लिंकद्वारा अभ्यास घटक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

शाळा बाहेरची शाळा: हा कार्यक्रम आकाशवाणीवरुन दर मंगळवारी व शुक्रवार सकाळी 10.30 ते 10.45 या वेळेत प्रक्षेपीत करण्यात येत आहे. स्मार्टफोनवरील अ‍ॅपद्वारा सुध्दा हा कार्यक्रम ऐकता येवू शकतो.जिल्ह्यातील काही गावामध्ये हा कार्यक्रम विहारे व मंदिरे येथे उपलब्ध असलेल्या लाऊड स्पीकरवरुन गावातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे.

ज्ञानगंगा टिव्ही चॅनल : प्रत्येक पालकांकडे स्मार्टफोन नसला तरी घरी टिव्ही असलेल्या पालकांची संख्या ही जास्त आहे. मुलांपर्यंत पोहचण्याचे सर्वात स्वस्त साधन आहे.

गली गली सिमसिम : शालेय अभ्यासक्रमावर आधारीत गली गली सिमसिम कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर रोज सकाळी 10 वाजता प्रक्षेपित करण्यात येत आहे.

मोबाईलद्वारे शिक्षण: शालेय स्तरावर आज पर्यंत 3 हजार 616 व्हॉटस अॅप गृप तयार करण्यात आलेले आहे. याद्वारे शिक्षक स्मार्टफोन धारक पालकांच्या मुलांपर्यंत शिक्षण पोहचवित आहेत.1 ली ते 8 वीच्या पाठयपुस्तकातील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित आहेत. त्यात कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नसतील. मुलांन घरी व परिसरात करुन बघता येतील अशा कृती निष्ठ शैक्षणिक अनुभव देण्यात येणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 10:49 am

Web Title: chandrapur district all sarpanch will help district management for online learning of students sas 90
Next Stories
1 गैरसौयींचा प्रादुर्भाव
2 वाडय़ातील मोकाट जनावरांचा प्रश्न सुटेना!
3 आंब्याच्या घन लागवडीकडे शेतकऱ्यांचे प्राधान्य
Just Now!
X