News Flash

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पाऊणकर व सीईओ दुबे यांना अटक

न्यायालयाने जामिन नाकारल्यानंतर दोघांनी पत्करणी शरणागती

मनोहर पाऊणकर व सिद्धार्थ दुबे

मागील पंधरवाड्यापासून फरार असलेले चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सिध्दार्थ नामदेव दुबे यांनी आज दुपारी आर्थिक गुन्हे शाखेत शरणागती पत्करल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याने, सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

बँकेच्या २४ कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियमबाह्य पध्दतीने अनुकंप तत्वावर नोकरीत सामावून घेतल्याप्रकरणी अध्यक्ष व सीईओ विरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला, तेव्हापासून दोघेही फरार होते.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील २४ कर्मचाऱ्यांना शारीरिकदृष्ट्या काम करण्यास असमर्थ असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र जोडून २४ पाल्यांना अनुकंप तत्वावर बँकेच्या सेवेत सामावून घेतले. या प्रकरणाची तक्रार बँकेचे संचालक संदिप गड्डमवार, संतोष रावत व माजी अध्यक्ष शेखर धोटे यांनी केली होती. राजकीय आशिर्वादामुळे तक्रारीनंतरही पाऊणकर यांच्याविरूध्द बरेच दिवस गुन्हा दाखल झाला नाही किंवा कारवाई झाली नाही. दरम्यान संचालक संदिप गड्डमवार यांनी रामनगर पोलीस ठाण्यात पुन्हा तक्रार दाखल करताच अध्यक्ष व सीईओ विरूध्द गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून अध्यक्ष व सीईओ दोघेही फरार होते.

या दरम्यान दोघांनीही जामिनासाठी जिल्हा न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता. दोन्ही न्यायालयाने जामिन फेटाळल्यानंतरही अध्यक्ष व सीईओ फरार होते. दरम्यान बँकेच अध्यक्ष पाऊणकर यांच्या विरोधात अविश्वास दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्याच दरम्यान पाऊणकर यांनी ३० सप्टेंबर पर्यंत सुटीवर जात असल्याचा अर्ज बँकेचे प्रभारी व्यवस्थापक यांच्याकडे पाठविला. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला.

चंद्रपूर जिल्हा बँकेची होत असलेली बदनामी थांबवायची असेल. तर अध्यक्ष व सीईओनी शरणागती पत्करावी असा सल्ला दोघांनाही देण्यात आला.  त्यानंतर आज सोमवारी दुपारी अध्यक्ष मनोहर पाऊणकर व सीईओ दुबे यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मकेश्वर यांच्या समोर शरणागती पत्करली. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक माहितीसाठी पोलिस निरीक्षक मकेश्वर यांना विचारणा केली असता, अध्यक्ष पाऊणकर व सीईओ दुबे यांनी शरणागती पत्करली, त्यानंतर त्यांना अटक केली आहे. उद्या त्यांना जिल्हा न्यायालयात सादर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 8:58 am

Web Title: chandrapur district central co operative bank chairman paunkar and ceo dubey arrested msr 87
Next Stories
1 महराष्ट्रात दुर्मिळ अशा ब्लॅक पँथरचे दर्शन
2 “देशातील जनता मनकवडी, हे मोदींनी ठरवून टाकलंय”; शिवसेनेचा मोदींवर टीकेचा बाण
3 पुरंदर तालुक्यातील पिसर्वे गावात ‘टोरनॅडो’ वादळ
Just Now!
X