News Flash

ताडोबा बफर क्षेत्रलगत वाघाची शिकार : सात आरोपींना अटक, वाघाची नखं आणि हाडं जप्त

वन-विभागाची कारवाई, परिसरात खळबळ

छायाचित्र प्रातिनिधीक आहे

ताडोबा-अंधारी प्रकल्पाच्या सीमेवर चंद्रपूर वन विभागाचे अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुट येथे एका वाघाचे हाड आणि इतर अवयव मिळाल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वन विभागाने सात जणांना ताब्यात घेतले आहे. ताडोबातील तीन वाघांच्या हत्येचे प्रकरण चर्चेत असतांना गुरुवारी ही शिकारीची घटना समोर आली आहे.

वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार वर्षांपूर्वी ताडोबा बफर क्षेत्रालगत वाघाची शिकार केली गेली. त्यानंतर मृतदेह एक खड्डा करुन गाडण्यात आला. या शिकारीचे बिंग फुटल्यानंतर गुरुवारी पुन्हा खड्डा खोदून वाघाची हाडे जप्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत या प्रकरणी ७ जणांना ताब्यात घेतले आहे. चार वर्षांपूर्वी रानडुकरची शिकार करण्यासाठी अटकेत असलेल्या सात लोकांनी फास लावला होता. त्यात वाघ फसला आणि त्याचा मृत्यू झाला. तब्बल ४ वर्षांनी हे प्रकरण समोर आल्यामुळे खळबळ माजली आहे. वन विभागाने आरोपींकडून वाघाची नखे, हाडे व इतर साहित्य जप्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 8:24 pm

Web Title: chandrapur forest officials arrest 7 persons in case of tiger poaching psd 91
Next Stories
1 महाराष्ट्र सोडून गेलेले परप्रांतीय परतण्यास सुरुवात, रोज १७ हजार कामगार परतत आहेत; ठाकरे सरकारची माहिती
2 कोयना व कृष्णा खोऱ्यातील पाऊस मोजण्यासाठी रेन गेज ठाणे उभारणार
3 चंद्रपुरात खर्रा विक्री करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड
Just Now!
X