चंद्रपूर

करोनाविरोधात सध्या सारेच जण लढा देत आहेत. करोनाचं जगभरात थैमान सुरु असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा राज्यात शिरकाव झाला. तेव्हापासून डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व इतर सहकारी जीवाची पर्वा न करता रुग्णांच्या सेवेत आहेत. मार्च महिन्यातच चंद्रपूर शहर महानगरपालिका येथे ‘करोना नियंत्रण कक्ष’ प्रस्थापित करण्यात आला. सदर नियंत्रण कक्षातील कर्मचारी आपल्या कुटुंबियांपासून, लहान मुलांपासून दूर राहून एकही दिवसाची रजा न घेता १२-१४ तास दररोज काम करीत आहेत.

क्वारंटाइन सेंटर मधील व्यक्‍तीची माहिती ठेवण्यापासून ते सॅनिटायझर, मास्क व इतर आवश्यक सामान पोहचविणे, कक्षातील मोबाईलवर येणार्‍या नागरीकांच्या तक्रारी सोडविणे, शहरात पॉझिटीव्ह पेशंट आल्यास त्याची माहिती गोळा करून त्या पेशंटचे वास्तव्य असणारे ठिकाण सिल करणे, त्यांना हॉस्पिटलाईझ करणे, रेल्वेनी येणार्‍या लोकांची माहिती गोळा करणे, चंद्रपूर शहरातील सर्व वार्डाचे ठिकाणी सर्दी – ताप – खोकला यासारखे आजार आढळुन आल्यास त्यांचा स्वॅब घेणे, शासननिर्देशित मोबाईल ॲपद्वारे नागरीकांचे स्वॅब घेणे जसे आरोग्य सेतु ॲप, सेफ्टी फर्स्ट ॲप इत्यादीमधुन मिळालेल्या माहितीच्या आधारे नागरीकांचे त्वरीत स्वॅब घेऊन तपासणी करणे, इत्यादी कामे करोना नियंक्षण कक्षात अहोरात्र केल्या जात आहेत.

मनपा आयुक्‍त राजेश मोहिते, उपायुक्‍त गजानन बोकडे, विशाल वाघ मार्गदर्शनात व वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. किर्ती राजुरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सदर करोना नियंत्रण कक्ष कार्यान्वित असून प्रत्येक व्यक्तीकडे जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पॉझिटीव्ह पेशंट आल्यास त्याचे अहवाल सादरीकरण तसेच पेशंटचे वास्तव्य सिल करण्याचे महत्वाचे काम शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधु करतात. क्वारंटाइन मधील रुग्णांना आवश्यक साहित्य वेळेवर पोहचविण्याची क्वारंटाइन सेंटरची महत्वाची जबाबदारी प्रविण गुळघाणे सांभाळतात. श्रीमती सुकेशीनी बिलवणे लसीकरण संनियंत्रण म्हणुन काम करीत असून, हॉटस्पॉट एरिया, रेड झोन भागामधुन आलेल्या रुग्णांचा अहवाल गोळा करणे, तसेच चंद्रपूर शहरातील इतर आजार असलेले रुग्ण म्हणजेच कोमार्बीड रुग्ण शोधुन त्यांचा अहवाल गोळा करणे व आरोग्य सेतु बाबतचा अहवाल वरीष्ठांना सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

सतिश अलोने हे खाजगी दवाखान्यांच्या देखरेखीचे काम करीत असून क्वारंटाइन सेंटरचीही जबाबदारी त्यांच्याकडे आहे. श्रीमती पायल गुरनुले यांचेकडे कोवीड १९ करीता लागणारे सर्व वैद्यकिय साहित्य खरेदी करण्यापासून ते पुरविण्यापर्यंतची जवाबदारी असून, श्रीमती पिंकी बावणे यांचेकडे रेल्वेनी शहरात आलेल्या लोकांचा अहवाल तयार करण्याचे काम असून, श्रीमती रितीशा दुधे यांचेकडे आरोग्य सेतु तसेच कोवीड सदृश्य आजाराचे रुग्ण तपासून त्यांचा पाठपुरावा करुन अहवाल तयार करण्याचे काम यांचेमार्फत केल्या जाते.

पॉझिटीव्ह रुग्ण शोधण्यास महत्वाची भुमीका बजाविणाऱ्या सेफटी फर्स्ट ॲपचे काम श्री. गणेश राखुंडे यांच्याद्वारे केले जाते. श्रीमती भाविका राऊंत, श्रीमती सुषमा मोखाडे, श्रीमती शुभांगी मोडकवार, श्रीमती अश्‍विनी चव्हाण,सागर वंगलवार, लोमेश गंपलवार, वैभव मत्ते हे ही करोना नियंत्रा कक्षात अहोरात्र काम करीत असून, प्रत्येक काम वेळेवर आणि जबाबदारीने पूर्ण करीत आहे.

करोना नियंत्रण कक्षाला वेळोवेळी जिल्हास्तरावरून तसेच शासनाकडुन अहवाल मागविला जातो. ही महत्वाची माहिती पुरविणे आणि त्याचा तांत्रिकदृष्टया पाठपुरावा परिचारीका श्रीमती ग्रेस नगरकर तसेच श्रीमती शारदा भुक्या यांच्याद्वारे केला जातो. प्रत्येक पेशंटचा अचूक अहवाल गोळा करणे आणि वरिष्ठांना तसेच शासनाला वेळोवेळी पुरविण्याचे काम त्यांच्यामार्फत केल्या जाते. त्यामुळेच आजपावेतो करोना बाबतच्या अहवाल हा समाधानकारक असून, याबाबत शासनस्तरावरून कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.