News Flash

चंद्रपूर : सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास मोजावे लागणार १२०० रुपये

उच्च न्यायालयाच्या आदेशाची चंद्रपूरात होणार अंमलबजावणी

उच्च न्यायालयाच्या आदेशाची चंद्रपूरात होणार अंमलबजावणी. (Photo: Amit Chakravarty)

करोनाच्या संकटात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय ही धोकादायक ठरू असून, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी आता २०० ऐवजी १२०० रुपये दंड आकारण्यात यावा, असं उच्च न्यायालयानं सूचित केलं होतं. न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी चंद्रपूर शहर महानगरपालिका करणार आहे. या शिवाय विनामास्क फिरणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे, असे असतानाही अनेक जण सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. विनामास्क फिरत असतात. सध्या करोनाचे संकट आहे. अशावेळी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास करोनाचे विषाणू हवेत पसरून महामारी पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठीच्या नियमावलीत सोशल डिन्स्टन्सिंग राखणे, हात साबणाने वारंवार धुणे आणि मास्कचा वापर याचा समावेश करण्यात आलेला आहे.

मास्कमुळे संसर्ग होण्यापासन संरक्षण होत असून, विषाणूचा फैलावही नियंत्रणात येतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या लोकांच्या सवयीला आळा घालण्यासाठी आणि मास्कची सवय लावण्यासाठी आता चंद्रपूर महानगरपालिका कठोर पावले उचलणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना कायदेशीर तरतुदीनुसार केवळ २०० रुपयांऐवजी १२०० रुपयांचा दंड आकारण्याच्या सूचना न्यायालयाने ७ एप्रिल २०२१ रोजी दिल्या होत्या. मदत व पुनर्वसन विभागाच्या २७ मार्च २०२१ रोजीच्या आदेशान्वये थुंकणे व विनामास्क याबाबत कठोर दंड वसूल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर करोनाच्या संसर्गापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन चंद्रपूर महापालिका प्रशासनाने नागरिकांना केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 3:52 pm

Web Title: chandrapur municipal corporation covid 19 covid appropriate rules bmh 90
Next Stories
1 राज्यातील सर्व गुन्ह्यांची उकल ‘एनआयए’ने करावी काय? – केशव उपाध्ये
2 संजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही अन् ‘सामना’ही वाचत नाही -नाना पटोले
3 मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकरचा अपघात; वाहतूक विस्कळीत
Just Now!
X