News Flash

चंद्रपूरमध्ये कडक लॉकडाउन; रस्त्यांवर शुकशुकाट

करोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांची प्रशासनाला साथ

चंद्रपूर

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शुक्रवारपासून शहर लावण्यात आलेल्या दहा दिवसाच्या टाळेबंदीला चंद्रपुरकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. टाळेबंदीसाठी महानगरपालिका प्रशासनाने एक दिवसापूर्वीच तयारी केल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार,पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सातत्याने लक्ष ठेऊन होते. मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त विशाल वाघ, गजानन बोकडे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात मनपाचे चारही सहायक आयुक्त धंनजय सरनाईक, सचिन पाटील, शीतल वाकडे, विद्या पाटील यांनी संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये पथकासह पाहणी करून लॉकडाऊन आदेशाचे काटेकोरपणे पालन होत असल्याबाबत खात्री केली.

शहरात आज पहिल्या दिवशी टाळेबंदीची कडक अंमलबजावणी होताना दिसून आली आहे. टाळेबंदीचे पालन करण्याचे आवाहन ४ ऑटोंद्वारे सातत्याने करून कोरोना संबंधी जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील सर्व बाजार, दुकाने व इतर आस्थापना सुरु राहू नये व कोणीही घराबाहेर पडू नये याची खातरजमा करण्यात आली. पोलीस विभागामार्फत पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात आली. महानगरपालिका व पोलीस विभागातर्फे सातत्याने दक्षता घेण्यात येत आहे.

पुढील दहा दिवस महानगरपालिकेकडून संसर्ग थांबविण्यासाठी युद्धपातळीवर तपासणी मोहीम राबविली जात आहे. मनपाद्वारे अँटीजन तपासणी केंद्रही स्थापित करण्यात आले असून याद्वारे संसर्गाची माहिती तात्काळ मिळण्यास मदत होणार आहे. शकुंतला लॉनवर मनपा आरोग्य विभागाचे डॉक्टर, नर्स सातत्याने कार्यरत असून उत्तम कामगिरी बजावीत आहेत. शहराच्या ८ प्रतिबंधित क्षेत्रात सातत्याने निर्जंतुकीकरण करण्यात येऊन सातत्याने फॉगिंग, फवारणी मनपा स्वच्छता कर्मचाºयांद्वारे केले जात आहे. जिल्ह्यातील २१८ कोव्हीड रुग्णांपैकी ६० रुग्ण चंद्रपूर शहरातील आहेत. शहरात अधिक संक्रमण होऊ नये, संक्रमित असणाºया रुग्णांचा शोध घेता यावा, यासाठी अधिक काळजी घेतली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 7:35 pm

Web Title: chandrapur observes strict curfew to break covid 19 chain vjb 91
Next Stories
1 ‘त्या’ वादावर बालभारतीचा खुलासा; “कुर्बान हुसेन यांचा उल्लेख चुकीने करण्यात आला हे म्हणणं संयुक्तिक नाही”
2 “टाळेबंदीच्या कालावधीतील गरीबांची वीज बिले त्वरित माफ करा, अन्यथा…”
3 “…तर तुम्ही शांत बसलेलंच अधिक योग्य राहील”; रोहित पवारांचा भाजपा नेत्याला टोला
Just Now!
X