ताडोबा व्याघ्र प्रकल्प लागत ब्रम्हपुरी तालुक्यातील कोलारा येथील लिलाबाई चंद्रहास धारणे ही महिला तेंदूपत्ता तोडून गोळा करण्यासाठी जंगलात सकाळी गेली असता वाघाने हल्ला करून फरकडत नेऊन ठार केले.  ताडोबा व्याघ्र प्रकल्प शेजारी असलेल्या सातारा बफर जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी कोलारा येथील महिला पुरुष गेले असता वाघाने तेंदूपत्ता तोडत असलेल्या लिलाबाई चंद्रहास धारणे वय 65 वर्ष या महिलेवर झडप घालून मानेची नरडी पकडली. महिलेने आरडा ओरड केली. आजुबाजूला पाने तोडत असलेले लोक धावत आले वाघ पळाला परंतु वाघाने नरडी पकडल्याने तिचा जीव जागेवरच गेला.

ह्या घटनेची माहिती मिळताच सातारा कोलारा येथील नागरिक घटनास्थळी धाव घेतली वन विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी सुद्धा घटनास्थळी पोहचून पुढील कारवाई करीत होते जवळपास दीड दोन महिन्यातील दुसरी घटना झाली. शर्मीली नावाची वाघीण असल्याचे उपस्थित नागरिकांत बोलले जात होते या घटनेने दहशत पसरली असली तरी त्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.