03 August 2020

News Flash

चंद्रपूर : राज्य राखीव दलाचे तीन जवान करोना पॉझिटिव्ह

सोमवारी दिवसभरात चंद्रपूरमधील एकूण चार जण करोना पॉझिटिव्ह

प्रतिकात्मक छायाचित्र

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्री उशिरापर्यंत एकूण सात करोनाबाधितांची भर पडली. यामध्ये  राज्य राखीव पोलीस दलाचे तीन जवान ( एसआरपीएफ ) आहेत. हे जवान मूळचे पुणे येथील निवासी आहेत. त्यामुळे त्यांची चंद्रपूरच्या करोनाबाधितांमध्ये गणना होणार नाही. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असला तरी कोणतेही लक्षणे नाहीत, त्यांची प्रकृती स्थिर असुन, त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

या तिघांना वगळता चंद्रपूर जिल्ह्यातील रविवारी १२१ वर असणारी करोना पॉझिटिव्ह  रुग्णांची संख्या वाढून सोमवारी १२५ झाली. आतापर्यंत ६२ जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६३ आहे. माहितीनुसार पुणे येथील रहिवासी असलेल्या आणि संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या २३, ५३ व २३ वयाच्या तीन जवानांचे रविवारी घेण्यात आलेले स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत.

हे तिघेही पुण्यातून आले होते.  १ जुलैला एकाच ठिकाणी हे तीनही जवान संस्थात्मक विलगीकरणात होते. तर सोमवारी दिवसभरात एकूण ४ रुग्ण चंद्रपूर जिल्हयात पॉझिटिव्ह ठरले आहे. यामध्ये नागपूरच्या कामठी परिसरातून २६ जून रोजी परत आलेल्या २७ वर्षीय उर्जानगर येथील रहिवासी असणाऱ्या व्यक्तीचा स्वॅब सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय पडोली येथील एमआयडीसीत काम करणाऱ्या ३६ वर्षीय नागरिकाचा स्वॅब देखील पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीने दोन ठिकाणी खासगी इस्पितळात ताप आल्यामुळे तपासणी केली होती. तत्पूर्वी सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आलेल्या दोन बाधितांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील संस्थात्मक विलगीकरणात असणाऱ्या भिवापूर वार्ड परिसरातील ३० वर्षीय महिलेचा समावेश आहे. हैदराबाद शहरातून ही महिला चंद्रपूरमध्ये आली होती. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला, आज तो पॉझिटिव्ह आला आहे. दुसरा बाधित हा करंजी येथील पॉझिटिव्ह बाधितांच्या संपर्कातील आहे. पोंभूर्णा तालुक्यातील मौदा येथील २१ वर्षीय तरुण संस्थात्मक विलगीकरणात होता. काल स्वॅब घेण्यात आल्यानंतर आज तो पॉझिटिव्ह ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 8:05 pm

Web Title: chandrapur three srpfs soldier found corona positive msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रात ५ हजार १३४ नवे करोना रुग्ण, २२४ मृत्यू
2 सातारा : २५ लाखांची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकास अटक
3 उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याच्या वाहन चालकाची गोळी झाडून आत्महत्या
Just Now!
X