चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्री उशिरापर्यंत एकूण सात करोनाबाधितांची भर पडली. यामध्ये  राज्य राखीव पोलीस दलाचे तीन जवान ( एसआरपीएफ ) आहेत. हे जवान मूळचे पुणे येथील निवासी आहेत. त्यामुळे त्यांची चंद्रपूरच्या करोनाबाधितांमध्ये गणना होणार नाही. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असला तरी कोणतेही लक्षणे नाहीत, त्यांची प्रकृती स्थिर असुन, त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या तिघांना वगळता चंद्रपूर जिल्ह्यातील रविवारी १२१ वर असणारी करोना पॉझिटिव्ह  रुग्णांची संख्या वाढून सोमवारी १२५ झाली. आतापर्यंत ६२ जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६३ आहे. माहितीनुसार पुणे येथील रहिवासी असलेल्या आणि संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या २३, ५३ व २३ वयाच्या तीन जवानांचे रविवारी घेण्यात आलेले स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत.

हे तिघेही पुण्यातून आले होते.  १ जुलैला एकाच ठिकाणी हे तीनही जवान संस्थात्मक विलगीकरणात होते. तर सोमवारी दिवसभरात एकूण ४ रुग्ण चंद्रपूर जिल्हयात पॉझिटिव्ह ठरले आहे. यामध्ये नागपूरच्या कामठी परिसरातून २६ जून रोजी परत आलेल्या २७ वर्षीय उर्जानगर येथील रहिवासी असणाऱ्या व्यक्तीचा स्वॅब सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय पडोली येथील एमआयडीसीत काम करणाऱ्या ३६ वर्षीय नागरिकाचा स्वॅब देखील पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीने दोन ठिकाणी खासगी इस्पितळात ताप आल्यामुळे तपासणी केली होती. तत्पूर्वी सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आलेल्या दोन बाधितांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील संस्थात्मक विलगीकरणात असणाऱ्या भिवापूर वार्ड परिसरातील ३० वर्षीय महिलेचा समावेश आहे. हैदराबाद शहरातून ही महिला चंद्रपूरमध्ये आली होती. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला, आज तो पॉझिटिव्ह आला आहे. दुसरा बाधित हा करंजी येथील पॉझिटिव्ह बाधितांच्या संपर्कातील आहे. पोंभूर्णा तालुक्यातील मौदा येथील २१ वर्षीय तरुण संस्थात्मक विलगीकरणात होता. काल स्वॅब घेण्यात आल्यानंतर आज तो पॉझिटिव्ह ठरला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur three srpfs soldier found corona positive msr
First published on: 07-07-2020 at 20:05 IST