29 September 2020

News Flash

भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी एकवटलं पाहिजे-चंद्रशेखर आझाद

अमरावती येथील जाहीर सभेत भाजपा सरकारवर टीका

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण

भाजपा आणि सध्याचं केंद्र सरकार घटना विरोधी आहे, बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनेला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजातल्या तळागाळातल्या माणसांना न्याय देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केलं आहे. अमरावती या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेत आझाद बोलत होते.

भीमा कोरेगाव या ठिकाणी सभा घेण्याचा आग्रह धरत आझाद यांनी मुंबईत आंदोलन केलं होतं. मात्र त्यांना सभेची संमती देण्यात आली नाही. ज्यानंतर त्यांनी अमरावती या ठिकाणी सभा घेऊन त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. ओबीसी, मुस्लिम, दलित, आदिवासी या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. सगळे एकत्र आल्याशिवाय या सरकारचे डोळे उघडणार नाहीत असेही चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2019 6:22 pm

Web Title: chandrasekhar aazad critisized bjp in amravati rally
Next Stories
1 मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी आमदारांच्या कोट्यात कपात; खेळाडू, अनाथांना मिळणार लाभ
2 भय्यूजी महाराज यांची आत्महत्या नव्हे हत्याच-रामदास आठवले
3 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उधळण्याचा मनसेचा इशारा
Just Now!
X