02 March 2021

News Flash

राज्यात निवडणुका स्वतंत्र लढू,मग सत्तेसाठी शिवसेने सोबत एकत्र येऊ –  चंद्रकांत पाटील

करोना गैरव्यवहारांचा बुरखा फाडणार असल्याचंही वक्तव्य

संग्रहीत छायाचित्र

कोल्हापूर : राज्यातील निवडणुकीला अजून चार वर्षाचा अवधी आहे. निवडणुका होतील तेव्हा स्वतंत्रपणे लढल्या जातील. त्यानंतर राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहोत, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे केले.

आमदार पाटील म्हणाले, बिहार मध्ये नितीश कुमार व लालूप्रसाद यादव यांनी एकत्र निवडणूक लढवली. पण पटत नसल्याने नितेश कुमार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर ते व भाजपने एकत्र येवून सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात हिंदुत्वाचा असा काही पेच झाल्याने असा बदल व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटले तर ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलतील. पण निवडणूक मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्य़क्ष जे. पी. नड्डा म्हणाले त्याप्रमाणे स्वबळावर लढली जाईल. त्यानंतर राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास आपण तयार आहोत.

 

करोना गैरव्यवहाराचा बुरखा फाडणार

पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडीवर निशाण साधला. ते म्हणाले, करोनाच्या चार महिन्याचा काळात मंत्रालयात बरेच निर्णय घेतले आहेत. त्याच्यावर आमची नजर आहे. याकाळात झालेल्या गैरव्यवहाराचा बुरखा भाजप कडून फाडला जाईल. सामाजिक अंतर राखून भाजप रस्त्यावर उतरेल. सध्या भाजप प्रखर विरोधकाच्या भूमिकेत आहे.

पवारांना टोला

केंद्र शासनाने राज्य शासनाला जीएसटी करातून १९ हजार कोटी रुपये देवूनही राज्य सरकार करोना निवारणासाठी काहीही करीत नाही. रस्ते, फुटकळ कामासाठी हा निधी खर्च होत आहे. कर्ज घेण्याच्या नव्या नियम बदलानुसार राज्याला अर्थसंकल्पाच्या चारपट म्हणजे १ लाख ६५ हजार कोटीचे कर्ज मिळू शकते. कर्ज घेवून करोना, विकासकामे करावीत. पैसे कोठून आणावेत असे आता शरद पवार यांनी विचारू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 7:01 pm

Web Title: chandrkant patil statement about shivsena in kolhapur scj 81
Next Stories
1 …..तर दुकानं कायमची बंद ठेवू म्हणत आर्वीतले व्यापारी आक्रमक
2 खरोखरच, पुण्याच्या तुलनेत मुंबईला झुकतं माप दिलं जातंय का?; वाचक म्हणतात…
3 चंद्रपूर : ताडाळी परिसरातील हजारो नागरिकांसाठी अँटीजन चाचणी सुविधा सुरू
Just Now!
X