24 September 2020

News Flash

‘शिवाजी महाराजांची कुणाशीही तुलना अशक्य’ -फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वाचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांची तुलना कुणाशीही होऊ  शकत नाही आणि ती कुणी करूही शकत नाही.

(संग्रहित छायाचित्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणाऱ्या भाजप नेत्याच्या पुस्तकावरून वाद सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर, आपल्या लिखाणातून काय अर्थ निघू शकतो याचा विचार करूनच प्रत्येकाने लेखन केले पाहिजे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुस्तक लिहिणारे भाजपचे जय भगवान गोयल यांचे कान टोचले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वाचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांची तुलना कुणाशीही होऊ  शकत नाही आणि ती कुणी करूही शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील एक भक्कम, मजबूत नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वात भारताचा लौकिक संपूर्ण जगात वाढत आहे. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊनच केला होता. शिवछत्रपतींच्याच मार्गाने आपली वाटचाल असेल, असे मोदी यांनी स्पष्ट केले होते. त्यांना शिवछत्रपतींच्या मार्गावर वाटचाल करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ज्या पुस्तकावरून वादळ सुरू आहे, त्या पुस्तकाचा भाजपाशी काहीही संबंध नाही. लेखकांनीसुद्धा ते पुस्तक परत घेण्याबाबतचा खुलासा केला आहे.

भाजपचे नेते विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी कँाग्रेसने विविध प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचा वापर केल्याबद्दल संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना राजकीय नेत्यांशी करणारे पुस्तक लिहिणे चूकच आहे.याविषयावर आक्षेप घेणाऱ्या राष्ट्रवादीने या प्रतीकांचा  उपयोग केला होता. राजमाता जिजाऊ व खासदार सुप्रिया सुळे यांचे छायाचित्र मुखपत्राच्या मुखपृष्ठावर एकत्र वापरले होते. ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना शाईस्तेखानाची बोटे छाटणाऱ्या शिवाजी महाराजांच्या रूपात राष्ट्रवादी कँाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दाखवले होते. त्यांना जाणता राजा हे शिवाजी महाराजांसाठी वापरण्यात येणारे विशेषणही पवारांसाठी वापरले जाते, याकडे लक्ष वेधत शिवाजी महाराजांचा अशाप्रकारे अवमान मराठा मावळे खपवून घेणार नाही, असा इशारा तावडे यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 12:51 am

Web Title: chatrpati shivaji maharaj impossible to compare to anyone akp 94
Next Stories
1 सावळ्या विठुरायाचे विदेशी नागरिकांकडून दर्शन
2 भातवर्गीय ‘राळे’ पिकासाठी २०२३ साल आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे होणार
3 राजकीय समीकरणे कधीही बदलू शकतात-प्रविण दरेकर
Just Now!
X