सांस्कृतिक क्षेत्रात आपली स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा उमटविणारे ‘चतुरंग’ प्रतिष्ठानचे संस्थापक कार्यकर्ते विद्याधर निमकर यांची मुलाखत उद्या मंगळवारी (१० डिसेंबर) दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर होणार आहे.

सकाळी ८ ते ८.४५ या वेळेत डी.डी. सह्याद्री वाहिनीवर ‘नमस्कार मंडळी’ या कार्यक्रमात ही मुलाखत प्रसारित होणार आहे. चतुरंग प्रतिष्ठानने ४२ वर्षात विविध उपक्रमांद्वारे सुमारे दीडहजार कार्यक्रम रसिकांसाठी सादर केले आहेत.

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान

यात एक कलाकार एक संध्याकाळ, सायंकाळी एक रांगोळी, पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ, मुक्तसंध्या, चैत्रपालवी संगीतोत्सव, सवाई एकांकिका स्पर्धा, श्रवणानंद, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी अभ्यासवर्ग आणि या सर्वावरील कळस म्हणजे चतुरंग रंगसंमेलन या कार्यक्रमांचा समावेश आहे. या सर्व कार्यक्रमातून आजवर ९०० हून अधिक कलाकार सहभागी झाले आहेत. चतुरंग प्रतिष्ठानची आजवरची वाटचाल या मुलाखतीतून उलगडली जाणार आहे.