21 September 2020

News Flash

घरात सापडलेल्या एका चिठ्ठीने पूर्वायुष्य पतीचे उलगडले

प्रेमविवाह केलेल्या तरुणीची फसवणूक

(संग्रहित छायाचित्र)

 

फेसबूकवरून ओळख झालेल्या ३३ वर्षांच्या तरुणाने सोलापुरातील एका १८ वर्षांच्या तरुणीशी मैत्री केली आणि त्याचे रूपांतर प्रेमात होऊन दोघांनीही घरातून पळून जाऊन उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे न्यायालयात नोंदणी पद्धतीने प्रेमविवाह केला. दोघेही एका भाडय़ाच्या घरात संसारात रममाण झाले असताना एकेदिवशी पतीचे खरे रूप समोर आले आणि पत्नीला जबर मानसिक धक्का बसला. घरात स्वच्छता करीत असताना लहान मुलाचा जन्मदाखला सापडला आणि त्यातून पतीच्या पहिल्या विवाहाचे बिंग फुटले. त्यानंतर फसवणूक झालेल्या त्या तरुणीने सोलापुरात येऊन पोलिसांत पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध फिर्याद नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हार्डवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या धीरेंद्रसिंह विजयसिंह चौधरी याने काही महिन्यांपूर्वी फेसबूकच्या माध्यमातून सोलापुरातील एका तरुणीशी ओळख निर्माण केली. नंतर त्यांच्यात मैत्री होऊन त्याचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेत पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे दोघांनी न्यायालयात नोंदणी पध्दतीने प्रेमविवाह केला. लग्नानंतरही पती धीरेंद्रसिंह याने पत्नीला स्वत:च्या घरी नेले नाही. उत्तर प्रदेशातील भरतपूर येथे दोघे पती-पत्नी एका भाडय़ाच्या घरात राहू लागले. त्यानंतर सासू राजवती व दीर लोकेंद्रसिंह चौधरी हे त्याठिकाणी राहण्यास आले.

तथापि, भाडय़ाच्या घरात एकेदिवशी पत्नीने साफसफाई हाती घेतली असता तिला लहान मुलाचा जन्मदाखला सापडला. तिने याबाबत पतीसह सासू व दिराकडे विचारणा केली. मात्र कोणीही काहीच सांगितले नाही. तरीही त्या तरुणीने संशयावरून विचारणा सुरूच ठेवली. तेव्हा दीर लोकेंद्रसिंह याने शेवटी सांगितले की, धीरेंद्रसिंह याचा पहिला विवाह झाला असून त्याला दोन मुले आहेत. ही माहिती ऐकून त्या तरुणीला धक्का बसला. पती, सासू व दीर यांनी तिला चार ते सहा महिने व्यवस्थित नांदविले. परंतु त्यानंतर तिचा छळ सुरू केला. तुझा विवाह फुकटात झाला असून लग्नात आम्हाला तुझ्या माहेराकडून काहीच मौल्यवान वस्तू मिळाल्या नाहीत. माहेरातून सोने व पैसे आण्याची मागणी करीत सासरी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरूच राहिल्याचे पीडित तरुणीने सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी तिचा पती, सासू व दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 12:57 am

Web Title: cheating on a married woman abn 97
Next Stories
1 पालघरमधील सर्वच रस्ते कोंडीग्रस्त
2 परराज्यातून आलेला ३२ लाखांचा मद्यसाठा जप्त
3 वसई-विरारमधील आरोग्य समस्यांचा वेध
Just Now!
X