शहरातील भुजबळ फार्म येथे उभारलेल्या अलिशान महालाचा राजेशाही थाट पाहून मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारीही चकीत झाले. फारसे कोणाच्या दृष्टिस न पडणाऱ्या महालाचे दरवाजे छापेसत्रामुळे प्रथमच किलकिले झाले. विधानसभा निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्राव्दारे छगन भुजबळ यांची मालमत्ता २२ कोटी तर पुत्र आ. पंकज भुजबळ यांची २१ कोटी रुपयांची असल्याचे उघड झाले होते. तथापि, या कारवाईत केवळ या महालाचीच किंमत १०० कोटीच्या घरात असल्याचे या विभागाने म्हटल्याने भुजबळ कुटुंबियांची ऐश्वर्यसंपन्नता प्रगट झाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आ. छगन भुजबळ, आ. पंकज भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या राज्यातील इतर मालमत्तांसह नाशिक जिल्ह्यातील घर व कार्यालयावर एकाचवेळी छापे टाकले. भुजबळ फार्म येथील चंद्राई आणि राम बंगला, राजेशाही थाटाची आठवण करून देणारा भुजबळ पॅलेस, येवला व मनमाड येथील बंगले आणि कार्यालय आदींचा त्यात समावेश आहे. ही कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. या सर्व छाननीत पथकाचे खऱ्या अर्थाने लक्ष वेधून घेतले ते भुजबळ महालाने. या महालावर ‘लोकसत्ता’ने आधीच प्रकाशझोत टाकला होता.
जुन्या काळातील राजेशाही महालाची आवृत्ती असणारी ही हवेली ४६ हजार ५०० चौरस फुट असून त्यात सुमारे २५ खोल्या आहेत. भुजबळ कुटुंबियांशी अतिशय निकटचे संबंध असणाऱ्या मोजक्याच लोकांना आजवर महालाचे प्रत्यक्ष दर्शन झाले आहे. अन्य कोणाला तिकडे फिरकण्यास सक्त मनाई. गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भुजबळ कुटुंबिय या महालात वास्तव्यास गेले. राजस्थानी पद्धतीच्या दुमजली महालाचे जलतरण तलाव, टेनिस मैदान, विस्तीर्ण हिरवळ असे आधुनिक रूप पाहून तपास अधिकारी थक्क झाले.

* विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात छगन भुजबळ यांनी २२ कोटी तर आ. पंकज भुजबळ यांनी २१ कोटी रुपयांची मालमत्ता दाखवली होती.
* त्यावेळी या महालाची माहिती दिली गेली की नाही याची छाननी तपास यंत्रणा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
* २००९  विधानसभा निवडणुकीवेळी भुजबळ पती-पत्नींकडे चल व अचल अशी एकूण सात कोटी ७५ लाख २९ हजार २३ रुपयांची मालमत्ता होती.
* पाच वर्षांत मालमत्तेची आकडेवारी २१ कोटी ९१ लाख रुपये झाली. नांदगाव मतदार संघाचे आ. पंकज भुजबळ यांच्या कुटुंबियांची एकूण मालमत्ता सुमारे २१ कोटींच्या घरात होती.

Major fire at Marathwada University premises
विद्यापीठ परिसरात आग; अग्निशमन विभागाचे अधिकारी, जवान घटनास्थळी दाखल
Kolhapur jobs 2024 Jilhadhikari Karyalay hiring
Kolhapur jobs 2024 : कोल्हापूरकरांनो, जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी! अधिक माहिती पाहा
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
A police officer was killed in firing by a goon near the Government Medical College Hospital in Kathua Jammu and Kashmir
गुंडाच्या गोळीबारात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; अन्य जखमी, जम्मू-काश्मीरमधील घटना