बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी आर्थर रोड तुरुंगात असलेले छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना तुरुंगात मिळणाऱ्या ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ची आता चौकशी होणार आहे. कारागृह विभागाने याप्रकरणात कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

आर्थिक गैरव्यवहार आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. याप्रकरणी दमानिया यांनी कारागृह विभागाच्या अतिरिक्त अधीक्षकांकडे ईमेलद्वारे तक्रारही केली होती. छगन भुजबळ यांना तुरुंगात टीव्ही उपलब्ध करुन देण्यात आले असून यावर ते हिंदी चित्रपट बघत असल्याचा दावा दमानिया यांनी केला होता. याशिवाय त्यांना तुरुंगात जेवणात चिकन मसाला, दर दोन तासांनी फळ आणि समीर भुजबळांना व्होडकाही उपलब्ध करुन दिली जात असल्याचे दमानिया यांनी ईमेलमध्ये म्हटले होते. समीर भुजबळ यांना दररोज तीन तास तुरुंगात मोबाईलवर बोलण्याची मुभा दिली जाते असे आरोप त्यांनी केला होता.

byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
arjun meghwal
साहित्य अकादमीच्या स्वायत्ततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीवर आक्षेप, सी. राधाकृष्णन यांचा सदस्यपदाचा राजीनामा

दमानिया यांच्या तक्रारीची दखल कारागृह विभागाने घेतली आहे. कारागृह विभागाने उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांना या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत. दमानिया यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. याप्रकरणात शुक्रवारी साठे यांची भेट घेणार असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.