छगन भुजबळ व्हीआयपी ट्रीटमेंटप्रकरणी पीएमएलए न्यायालयाने जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना दणका दिला आहे. पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी लहाने यांना न्यायालयाने दोषी ठरवले असून याप्रकरणी शिक्षेचा निर्णय पीएमएलए कोर्टाने मुंबई हायकोर्टाकडे सोपवला आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यासह आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. मात्र यातील ४० हून अधिक दिवस भुजबळ हे रुग्णालयात होते.  बॉम्बे रुग्णालयात भुजबळ यांच्यासाठी दोन व्हिआयपी खोल्या होत्या असा दावा केला जात होता. बॉम्बे रुग्णालयातील मुक्कामादरम्यान छगन भुजबळ यांची २६ जणांनी भेट घेतली होती. याप्रकरणी अंजली दमानिया यांनी रुग्णालयात याचिकाही दाखल केली होती.

Nagpur Bench of Bombay High Court, Dismisses PIL, Alleging Illegal Killing Tigress, Tigress Avani, tigeress avani Illegal Killing , supreme court, public interest litigation, marathi news, animal rights,
अवनी वाघीण मृत्यूप्रकरण : उच्च न्यायालय म्हणाले, ‘पुन्हा युक्तिवाद…’
employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ
Director of Rosary School
पुणे : रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहानासह दोघे अटकेत, मध्यरात्री शिवाजीनगर विशेष न्यायालयात हजर

अंजली दमानिया यांच्या याचिकेनुसार भुजबळांना १७ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या काळात जे. जे. इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी इस्पितळाच्या औषधशास्त्र विभागाने भुजबळ यांच्यावर होल्टर मॉनिटरिंग, इलेक्ट्रो फिझिओलॉजिकल स्टडी आणि थॅलिअम स्कॅन या तीन चाचण्या करण्यास सुचविले होते. या चाचण्या केईएम इस्पितळात उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले होते. ‘केईएम’मधील पथक तुरुंगात येऊन चाचणी करण्यात तयार होते, परंतु भुजबळ यांनी तुरुंगात चाचणी करून घेण्यास नकार दिला. याशिवाय थॅलिअम स्कॅन चाचणी उपलब्ध नसल्याचेही केईएम इस्पितळाने कळविले. त्यामुळे २६ ऑक्टोबर रोजी विशेष न्यायालयाने थॅलिअम स्कॅन खासगी, तर उर्वरित चाचण्या जे. जे. इस्पितळात करण्यास परवानगी दिली. त्यानुसार दोन चाचण्या झाल्यानंतर भुजबळ यांना २ नोव्हेंबर रोजी जे. जे. इस्पितळातून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

अंजली दमानिया यांच्या याचिकेनंतर पीएमएलए कोर्टाने तात्याराव लहाने यांना समन्सही बजावले होते. शुक्रवारी दमानिया यांच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत कोर्टाने लहाने यांना दोषी ठरवले आहे. पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आता याप्रकरणी शिक्षेचा निर्णय मुंबई हायकोर्टच घेईल असे पीएमएलए कोर्टाने म्हटले आहे.