News Flash

छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांची आत्महत्या

अवघ्या पाच दिवसांपूर्वी प्रदीप निंबाळकर यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता

छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांनी आत्महत्या केली आहे. स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. इंदापूरमधील सणसर येथील राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. दुपारी अडीचच्या वाजण्याच्या सुमारास त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. दरम्यान ही आत्महत्या आहे का आणि त्यामागे नेमकं काय कारण होतं यासंबंधी पोलीस तपास करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवघ्या पाच दिवसांपूर्वी प्रदीप निंबाळकर यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांना अध्यक्षपद देण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, कामगारांना बोनस देण्याच्या मुद्द्यावरून प्रदीप निंबाळकर तणावात होते. यावरुन कारखान्यातील काही संचालकांचे कार्यकारी संचालकांशी मतभेद झाले होते.

दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरातील वरच्या मजल्यावरुन गोळी झाडली गेल्याचा आवाज आला होता. यावेळी कुटुंबीयांनी जाऊन पाहिलं असता प्रदीप निंबाळकर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत असून आत्महत्या करण्यामागे नेमकं काय कारण असावं याचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 6:16 pm

Web Title: chhatrapati co operative sugar mill president pradeep nimbalkar commits suicide
Next Stories
1 गोवत्सपूजनाने झगमगत्या दीपोत्सवाचा प्रारंभ
2 भीमा-कोरेगांव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाकडे पोलिसांचे प्रतिज्ञापत्र
3 ऐन दिवाळीत पालिकेतील कंत्राटी कामगार वेतनाविना
Just Now!
X