News Flash

मारहाणप्रकरणी छिंदम बंधूंना अटक

शहरातील भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ माजी नगरसेवक श्रीकांत छिंदम (काँग्रेस) या दोघांना तोफखाना पोलिसांनी सोमवारी मारहाणीच्या गुन्ह्य़ात अटक केली.

| May 19, 2014 03:33 am

शहरातील भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ माजी नगरसेवक श्रीकांत छिंदम (काँग्रेस) या दोघांना तोफखाना पोलिसांनी सोमवारी मारहाणीच्या गुन्ह्य़ात अटक केली. सोनू उर्फ इंद्रभान बाबुराव बोरुडे याने याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सोनू हा जखमी असून रुग्णालयात दाखल आहे. तो काँग्रेसचा माजी नगरसेवक धनंजय जाधव याचा समर्थक आहे. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीपासून जाधव व छिंदम समर्थकांमध्ये वारंवार कुरबुरी सुरू आहेत.
सोनू हा सकाळी दिल्लीगेट भागातील बनेसाब पटांगण भागातून जात असताना, तेथेच राहणा-या छिंदम बंधूंनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. श्रीपाद यानेही जाधव समर्थक सोनू व मोहसीन शेख या दोघांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आपल्या बांधकामावरील स्टील दोघांनी चोरल्याचा आरोप श्रीपाद याने तक्रारीत केला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक  उबाळे करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 3:33 am

Web Title: chhindam brothers arrested in case of beaten 2
Next Stories
1 साळोखे धमकी प्रकरणी उत्तर प्रदेशमध्ये पथके पाठविणार
2 साळोखे धमकी प्रकरणी उत्तर प्रदेशमध्ये पथके पाठविणार
3 आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपची सांगलीत निदर्शने
Just Now!
X