News Flash

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी रायगड जिल्ह्यात, नुकसानग्रस्तांना करणार मदत

मुरुडमध्ये होणार पत्रकार परिषद

संग्रहित छायाचित्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या रविवारी १४ जून रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असून चौल, बोर्ली, मुरुड येथे चक्रीवादळग्रस्तांना त्यांच्या हस्ते मदत साहित्य आणि अनुदान वाटप केले जाणार आहे. सकाळी १० वाजता मुख्यमंत्री मांडवा जेट्टी येथे पोहचतील. त्यानंतर चौल येथे जाऊन ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. ११ वाजता चौल मधील घरे, पिके नुकसानीची पाहणी करून नंतर त्यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान, सौर कंदील, इतर साहित्याचे वाटप करण्यात येईल. दुपारी १२ वाजता त्यांचे बोर्ली येथे आणि १२.३० वाजता मुरुड येथे आगमन होईल. दोन्ही ठिकाणी नुकसानीची पाहणी आणि मदत वाटप करण्यात येईल. मुरुड येथे त्यांची पत्रकार परिषद देखील होईल. दुपारी ३ वाजता मांडवा जेट्टी येथून बोटीने ते मुंबईकडे रवाना होतील.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 7:25 pm

Web Title: chief minister uddhav thackeray will help the people who affected in nisarga cyclone in raigad district scj 81
Next Stories
1 वर्धा जिल्ह्यातील धक्कादायक घटना; शवागारात ठेवलेला बालकाचा मृतदेह उंदरांनी कुरतडला
2 ‘निसर्ग’च्या नुकसानग्रस्तांना अद्याप एक रुपयाची मदतही मिळाली नाही-फडणवीस
3 दहावी-बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केलेली नाही; शिक्षण मंडळानं केला खुलासा
Just Now!
X