News Flash

“घरातून करतोय तर एवढं काम होतंय, बाहेर पडलो तर….!” विरोधकांना उद्धव ठाकरेंचा खोचक टोला!

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते.

Uddhav Thackrey
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांशी ऑनलाइन संवाद (संग्रहित फोटो)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाकाळात घरात राहूनच राज्यकारभार करत आहेत. ते घराबाहेर पडतच नाहीत, अशी टीका मुख्यमंत्र्यांवर सातत्याने विरोधकांकडून होत आहे. विरोधकांच्या याच टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “विरोधक सातत्याने माझ्यावर घराबाहेर पडत नाही, घरातून कारभार करत आहेत म्हणून टीका करतायत. त्यांना मला सांगायचं आहे की, घरातून काम करतोय तर एवढं काम होतंय, मग बाहेर पडलो तर विचार करा किती काम होईल.”

हेही वाचा- शिवसेनेचा वर्धापन दिन Live: पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वबळावरून काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या टोला

करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण लोकांना घरात राहायला सांगत आहोत आणि स्वतःच घराबाहेर पडायचं हे पटत नसल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. ते म्हणाले, “करोनाच्या प्रादुर्भावामुळे मी सातत्याने जनतेला आवाहन करत आहे की, घरातून बाहेर पडू नका, घरातच राहा आणि मीच घराबाहेर पडतोय हे मला बरोबर वाटत नाही. पण मी लवकरच बाहेर पडणार आहे.”

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. ”अनेकांच्या पोटात दुखतंय. पण शिवसेना त्यांना औषध देतेय. मी अनेकांचं अंतर्मन पाहिलं आहे. त्यामुळे अनुभवाचं गाठोडं घेऊन पुढे जात आहे. अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. आपण पण स्वबळाचा नारा देऊ. न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ लागतं. अन्याय होतोय आणि न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ नाही. तलवार उचलण्याची हिम्मत नाही. आधी तलवार उचलण्याची ताकद तर कमव. मग वार कर. स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो आहे. निवडणुका येतात जातात. हार जीत होत असते. कुणी हरतं, कुणी जिंकतं. जिंकलं तर आनंद आहे. पण हरल्यानंतरसुद्धा पराभूत मानसिकता घात करते”, असा टोमणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला मारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2021 7:39 pm

Web Title: chief minister uddhav thackrey slams opponents on their critisism why uddhav thackrey work from home vsk 98
Next Stories
1 पाटील- येडियुरप्पा भेटः महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीवर महत्त्वपूर्ण चर्चा
2 “मनगटात ताकद नसती तर काहीच होऊ शकलं नसतं”, शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा ऑनलाईन संवाद
3 “ज्यांना काही उद्योग नाहीत…,” निलेश राणेंच्या टीकेला अजित पवारांनी दिलं उत्तर
Just Now!
X