05 July 2020

News Flash

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज रत्नागिरीत

यात्रेची जय्यत तयारी सुरू असून शहरात विविध ठिकाणी फलक प्रदर्शित झाले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज (१७ सप्टेंबर) संध्याकाळी  रत्नागिरीत येत आहे.

सकाळच्या सत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौरा केल्यानंतर फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दुपारी चार वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विनोद तावडे, आशिष शेलार, गिरीष महाजन, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन आणि सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी या ठिकाणी यात्रेमध्ये  सहभागी होणार आहेत. तेथे स्वागतानंतर आडिवरे, पावसमाग्रे ही यात्रा रत्नागिरी शहरात पोचणार असून येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा संध्याकाळी साडेपाच वाजता आयोजित केली आहे. कोकणच्या विविधांगी विकासासाठी मुख्यमंत्री या सभेत काही ठोस योजना जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे.

सभेनंतर मुख्यमंत्र्यांचा मुक्काम रत्नागिरीत असून बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेनंतर महाजनादेशयात्रा नाशिककडे प्रयाण करणार आहे.

दरम्यान,  यात्रेची जय्यत तयारी सुरू असून शहरात विविध ठिकाणी फलक प्रदर्शित झाले आहेत. जागोजागी स्वागताचे फलक व भाजपचे झेंडे सर्वत्र पाहायला मिळत असून वातावरण भाजपमय झाले आहे.

जिल्ह्यात भाजपचे गतवैभव पुन्हा आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा नक्कीच कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 1:19 am

Web Title: chief ministers mahajendesh yatra in ratnagiri today abn 97
Next Stories
1 वर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले
2 जागतिक बँकेच्या माध्यमातून महापुरावर शाश्वत उपाययोजना-मुख्यमंत्री
3 महाजनादेश यात्रेच्या मार्गातील अडसर ठरणाऱ्या झाडांवर कुऱ्हाड!
Just Now!
X