News Flash

बिबटय़ाच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यामध्ये जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावातील सहा वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडला, तर अडीच वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली.

| April 18, 2015 03:23 am

बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यामध्ये जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावातील सहा वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडला, तर अडीच वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली. तिच्यावर पिंपरीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
खामुंडी गावातील जंगलालगतच्या बाडगी येथे बिबटय़ाने प्रवीण देवराम दुधवडे (वय ६ मूळ रा . पिंपळगाव माथा ता. संगमनेर, जि.नगर) याच्यावर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. प्रवीण हा आईसमवेत आजोळी आला होता. प्रवीणची आजी सगुणाबाई पहाटे उठून काही वेळासाठी बाहेर गेल्या. तेवढय़ात प्रवीणला बिबटय़ा पळवून नेत होता. सगुणाबाई यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना हुलकावणी देऊन बिबटय़ाने प्रवीणला घरापासून एक किमी अंतरावर फरफटत नेले. त्यात त्याचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 3:23 am

Web Title: child killed in leopard attack at junnar
टॅग : Leopard,Leopard Attack
Next Stories
1 महिला सराफाला लुटणाऱ्या टोळीचा २४ तासात छडा
2 टँकरवाडय़ात ‘जार’चा वार!
3 परभणी शहराचा पाणीपुरवठा सहा दिवसांत सुरळीत करणार
Just Now!
X