News Flash

चीनमध्ये अडकलेल्या रत्नागिरीमधील तीन विद्यार्थिनी सुखरुप, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

या मुली खेड तालुक्यातील असून चीनमधील नानटॉग प्रांतातील विद्यापीठात शिक्षणासाठी गेल्या आहेत

कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे. चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये महाराष्ट्रातील काहीजण असून यामध्ये रत्नागिरीमधील तीन मुलींचा समावेश आहे. या मुली खेड तालुक्यातील असून चीनमधील नानटॉग प्रांतातील विद्यापीठात शिक्षणासाठी गेल्या आहेत. दरम्यान या तिन्ही विद्यार्थिनी सुरक्षित असून त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. एका विद्यार्थिनीशी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दूरध्वनीवर संपर्क करून संवाद साधला. यावेळी मुली सुखरुप असल्याची माहिती त्यांनी दिली.

सध्या त्यांच्या सुट्ट्यांचा कालावधी आहे. या सुट्ट्या 23 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहेत. चीनमधील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे कुणालाही घराबाहेर जाण्याची मुभा दिलेली नाही. त्यामुळे या तिघीजणी घरातच आहेत. या मुलींना भारतात सुखरूप आणण्यासाठी दूतावासामार्फत प्रयत्न सुरू झाले आहेत. चीनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. हे विद्यार्थी पुणे, पिंपरी चिंचवड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेडमधील येथील आहेत. ही मुलं युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत आहेत.

कोरोनामुळे नेमकं काय होतं?
कोरोना विषाणूने सर्दीपासून श्वसनाच्या गंभीर आजारापर्यंत समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या विषाणूच्या संसर्गाने ताप, कफ, श्वसनात अडथळे अशी लक्षणे दिसत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४४० जणांना या विषाणूची लागण झाली असून त्यांच्यात न्यूमोनियाची लक्षणे दिसत आहेत. आतापर्यंत मध्य चीनमधील हुबेई प्रांतात नऊ बळी या विषाणूने घेतले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे उपसंचालक ली बिन यांनी दिली आहे.

काय आहे कोरोना व्हायरस? कशी घ्याल काळजी
कोरोना व्हायरस सार्स’मध्ये(SARS) जागतिक साथीचा रोग म्हणून आधीच ओळखले गेले आहे, ज्यामुळे आठ हजार लोकांपेक्षा जास्त प्रमाणात जगभरात मोठ्या प्रमाणात बाधीत रुग्ण आढळले. सध्याच्या माहितीनुसार, जलचर जीव अशा प्रकारचे विषाणू संक्रमित करण्याचे ज्ञात नाही, म्हणूनच सीफूडपासून हा वायरस उद्भवण्याची शक्यता नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये, मानवी संक्रमणाची ओळख पटली गेली आहे. सर्वांत प्रभावित होणारा महत्त्वाचा अवयवाचा सहभाग म्हणजे फुफ्फुसांचा आणि त्यानंतर आतडे. पारंपारिकपणे हे संक्रमण अशा लोकांवर परिणाम करतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी आहे, तरीही हे संक्रमण आजार नसलेल्या तरुण व्यक्तींवर देखील परिणाम करीत आहे. तरीही आतापर्यंत यावर, कोणतेही अँटिबायोटिक किंवा लस उपलब्ध नाही, म्हणूनच उपचार पूर्णपणे नैसर्गिक आधारावर केले जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 11:02 am

Web Title: china coronavirus three girl students of ratnagiri sgy 87
Next Stories
1 … हा तर सकाळी लवकर शपथ घेतो; अजित पवारांची तुफान फटकेबाजी
2 औरंगाबादमध्ये क्रूझरची ट्रेलरला धडक, भीषण अपघात चार भाविकांचा जागीच मृत्यू
3 राज्यातील सात मुले चीनमध्ये अडकली
Just Now!
X