प्रदीप नणंदकर
‘होती आली येळ अन् गाजराचं झालं केळ’ अशी ग्रामीण म्हण प्रचलित आहे. त्या म्हणीची प्रचीती गेल्या काही वर्षांपासून येत असूर्न चिंचोक्याला एके काळी काहीर्च किंमत नव्हती. ती आता वाढत ज्वारीपेक्षाही बाजारपेठेर्त चिंचोक्याने मानाचे स्थान मिळविले आहे.
लातूर बाजारपेठेत खरीप हंगामातील हायब्रिड ज्वारीचा भाव सरासरी ९०० ते ९५० रुपये प्रति क्विंटल आहे. पिवळी ज्वारीचा भाव १५०० रुपये प्रति क्विंटल, तर रब्बी हंगामातील बडी ज्वारी, मालदांडी यांचा भाव सध्या २१०० रुपर्ये क्विंटल आहे. हायब्रिड ज्वारी ही परवडणारी नसल्याने शेतकरी त्याचा पेरा काही वर्षांपासून कमी करत आहेत. जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून ज्वारीचा पेरा केला जातो. ज्वारीचा वापर हा फक्त खाण्यासाठी होतो. त्यातही केवळ ग्रामीण भागात व जुन्या पिढीतील लोकच ज्वारी खाणे पसंत करतात, त्यामुळे ज्वारीला खाण्यासाठीदेखील म्हणावी तशी मागणी नाही. राज्यातील केवळ दोन-तीन जिल्ह्यांत ज्वारीचे उत्पादन घेतले गेले तरी संपूर्ण राज्याला वर्षभर खाता येईल एवढे ज्वारीचे उत्पादन होते. गरजेपेक्षा अधिक उत्पादन झाले की भाव पडतात. याउलर्ट चिंचोक्याने मात्र भावाच्या बाबतीत गेल्या काही वर्षांत झपाट्याने प्रगती केली आहे. एके काळी २५ पैसे किलोर्ने चिंचोका विकला जायचा. त्या काळात ‘पैसे दिलेतर्, चिंचोके नाही’ असे लोक ठोकून बोलत. कालांतरार्ने चिंचोक्याच्या भावात वाढ होऊ लागली, कारण त्याचा वापर विविध क्षेत्रांत वाढला.
पूर्वी दक्षिण भारतात जनावरांना खाद्य म्हणूर्न चिंचोक्याचा वापर होत असे. केरळ व तमिळनाडू प्रांतांत अजूनही हत्तीर्ला चिंचोके भाजून खायला देतार्त. चिंचोका भाजून त्याचे टरफल काढून आतील पांढरा भाग कपडा तयार करणाऱ्या धाग्याला मजबुती मिळावी यासाठी वापरला जातो. त्याला सार्यंजग असे म्हणतात. १९८० ते ९० या दशकार्त चिंचोक्याचा वापर या कारणासाठी वाढला. टेक्स्टाइल मिलमध्ये गवारगमचा वापर होता. त्याला पर्याय म्हणूर्न चिंचोक्याची पावडर डाइंगसाठी वापरली जाऊ लागली अनर्् चिंचोक्याला मागणी वाढली.
२००७ साली ३५० रुपर्ये क्विंटर्ल चिंचोक्याचा भाव होता. २०१७ पासून १७०० ते १८०० रुपयांपर्यंर्त चिंचोक्याचा भाव स्थिर आहे. गतवर्षी करोनातील टाळेबंदीमुळे हा भाव १५०० रुपयांपर्यंत घसरला होता. त्यानंतर २३०० रुपयांपर्यंत भाववाढ झाली होती. सध्या लातूर बाजारपेठेत दररोज १ हजार्र क्विंटर्ल चिंचोक्याची आवक असून भाव १८०० रुपर्ये क्विंटल आहे, तर शेजारच्या बार्शीमध्ये दररोज ५ हजार्र क्विंटलची आवक असून भाव १९०० रुपये प्रति क्विंटल आर्हे. चिंचोक्याची पावडर निर्यात करून ४०० कोटी रुपये दरवर्षी भारताला मिळतात. जाम, आइस्क्रीम, सॉफ्ट ड्रिंक, सूप अशा अन्नपदार्थांबरोबर औषधी वापराकडेही संशोधन वाढले आहे. डोळ्यात टाकण्याच्या औषधांमध्र्ये चिंचोक्याचा वापर सुरू झाला असून त्यालाही मान्यता मिळते आहे.
बार्शी केंद्र
बार्शी र्हे चिंचोक्यावर प्रक्रिया करणारे केंद्र्र असून दररोज सुमारे२५०र्० क्विंटर्ल चिंचोका प्रक्रिया करण्यासाठी उद्योगांना लागतो. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नगर, नाशिक या सर्व ठिकाणर्चा चिंचोका बार्शीत खरेदी केला जार्तो. चिंचोक्याचा वापर पेपर इंडस्ट्रीमध्ये आगामी काळात वाढला तर्र चिंचोक्याचे भाव आणखीन वाढतील. आर्ता चिंचोक्याचे भाव नक्की कमी होणार नाहीत, कारर्ण चिंचोक्याचे महत्त्व पटले असल्याचे बार्शी येथील छाया इंडस्ट्रीजचे मनोहर सोमाणी यांनी सांगितले. ज्वारीचा वापर केवळ खाण्यासाठी केला जातो. ज्वारीपासून पोहे, शेवया, बिस्किट तयार करण्यासाठी त्याचा वापर आगामी काळात वाढू शकतो. तसे संशोधन सुरू आहे. रब्बी हंगामातील ज्वारीमध्ये प्रोटीनचे प्रमाण १३ टक्क्यांपर्यंत आहे. ज्वारीचा औद्योगिक वापर सुरू झाला की ज्वारीचे भावही वाढतील, असे वसंतराव नाईक कृषी महाविद्यालय परभणीतील शात्रज्ञ डॉ. शिवाजी म्हेत्रे यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2021 12:20 am