सिंधुदुर्ग जिल्ह्यतील चिपी विमानतळ मी बांधला आहे, तो २०१४ पर्यत मी बांधून पुर्ण केला होता. त्यामुळे त्याठिकाणी विमान उतरवणे आणि उड्डान करण्याची जबाबदारी मी घेईन,लवकरात—लवकर ते सुरू होण्यासाठी मी संबधित मंत्र्यांची भेट घेईन,असा दावा खासदार नारायण राणे यांनी केला.

शिवसेनेच्या आमदार—खासदारांना जिल्ह्याबाबत आस्था नाही. जिल्ह्य़ाला विकासात मागे टाकण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे.त्यामुळे असे आमदार खासदार हवेतच कशाला,असा ही प्रश्न त्यांनी या वेळी केला.

श्री राणे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी केद्र शासनाच्या माध्यमातून आणण्यात आलेले कृषी विधेयक कशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे,याबाबत माहिती दिली. तर आघाडी सरकारवर जोरदार टिका केली. या सरकारने महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेण्याचे काम केले आहे. असा आरोप करीत आपले अपयश झाकण्यासाठी दोन दिवसांत अधिवेशन गुंडाळण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.