इचलकरंजी शहरातील लाल नगर परिसरात  रेशन दुकानदार आणि नागरिकांमध्ये आज हाणामारीचा प्रकार घडला.  टाळेबंदीमुळे गरीब लोकांना रोजगार नसल्याने शासनाने रेशन दुकानातून केसरी कार्डावर आजपासून धान्य वितरण सुरू केले आहे. ८ रुपये किलो गहू व १२ रुपये प्रमाणे तांदूळ देण्यास सुरुवात झाल्याने लालनगर परिसरात ग्राहकांची एकच गर्दी झाली होती.

यावेळी शाब्दिक वादावादी होऊन दुकानदार व काही ग्राहकांमध्ये हाणामारी झाली. दुकानातील टेबल व खिडक्यांची तोडफोड झाली.  रेशन दुकानदाराला कार्डधारकांना चांगलाच चोप दिला. याची माहिती मिळाल्यानंतर
घटनास्थळी गावभाग पोलीस दाखल झाले.

दरम्यान,शहरातील जुना चंदुर रोडवरील रेशन धान्य दुकानासमोर पहाटे पासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. दुकानदाराची वेळेवर दुकान न उघडल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला. तीन तास दुकान सुरू न झाल्याने नागरिक हैराण झाले होते. इचलकरंजी शहरातील हलगर्जीपणा करणाऱ्या रेशन दुकानावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.