News Flash

परळीतील मतदान केंद्रावर भाजपा-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी

जिल्हा बँक निवडणूक; बहिष्कारानंतरही भाजपा नेते मतदान केंद्रांवर

संग्रहीत

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी जिल्हा बँक निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून चुकीच्या पध्दतीने प्रक्रिया राबवली गेल्याचा आरोप करत मतदानाच्या काही तास अगोदर निवडणुकीवर बहिष्काराची घोषणा केली होती. मात्र शनिवारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर भाजपाचे कार्यकर्ते व नेतेही काही ठिकाणी दिसून आले. तर परळी शहरातील औद्योगिक वसाहत केंद्रावर तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात मारहाण झाल्याची घटना घडली. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासह दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते काही वेळातच या केंद्रावर दाखल झाले.  ११ मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले.

बीड जिल्ह्यात शनिवार आज (शनिवार)  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या १९ पैकी ८ जागांसाठी मतदान झाले. ४१ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. भाजपाकडून बँक काढून घेण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राजकीय कौशल्य पणाला लावून भाजपाची पुरती कोंडी केली. अखेरीस मतदानाच्या एकदिवस अगोदर भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी निवडणुकीवरच बहिष्कार घालण्याची घोषणा केल्याने राष्ट्रवादीसाठी निवडणुक एकतर्फी झाली. ऐनवेळी सत्तेचा गैरवापराचा आरोप करुन निवडणुकीवर बहिष्कार टाकून माघार घेणे हा पळपुटेपणा असल्याचा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला. तर शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाने या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली.

आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत, आमदार संजय दौंड यांनी अंबाजोगाईत, माजी आमदार अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांनी गेवराईत तर सुशिला मोराळे, रविंद्र दळवी यांनी बीडमध्ये मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान परळी येथील औद्योगिक वसाहत मतदान केंद्रावर सायंकाळी चार वाजता वेळ संपल्यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. घटनेची माहिती मिळताच पंकजा मुंडे यांनी घटनास्थळी येऊन राष्ट्रवादीच्या गुंडगिरीचा निषेध नोंदवला.

अकरा केंद्रांवर झाले मतदान
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पदाच्या ८ जागांसाठी शनिवारी ११ केंद्रांवर मतदान झाले. सकाळी ८ पासून दुपारी ४ वाजेपर्यंत बीड येथील केंद्रावर १७०, गेवराई १६५, वडवणी ३२, माजलगाव ७३, धारुर ३४, केज ५२, परळी ५६, अंबाजोगाई ८३, शिरुर ५३, पाटोदा ३२, आष्टीत ५६ मतदारांनी हक्क बजावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 10:48 pm

Web Title: clashes between bjp and ncp workers at parli polling station msr 87
Next Stories
1 Coronavirus – राज्यात दिवसभरात ९२ रूग्णांचा मृत्यू , २७ हजार १२६ करोनाबाधित वाढले
2 #ResignAnilDeshmukh : परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर उद्या राज्यभर भाजपाची निदर्शनं!
3 परमबीर सिंग यांच्या गौप्यस्फोटानंतर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Just Now!
X