13 December 2019

News Flash

हिवरे बाजार पुन्हा ठरले एक नंबर, मिळाला ३५ लाख रुपयांचा पुरस्कार

आदर्शगाव हिवरेबाजारने स्वच्छतेची गरज व त्यातील सातत्य टिकवून ठेवले आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत हिवरे बाजार गावाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. दोन्ही पुरस्कारावर हिवरे बाजार गावाने नाव कोरले आहे. नाशिक विभागात नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजार प्रथम आले आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत ही महिती दिली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामपंचायत स्पर्धेमध्ये हिवरे बाजारने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छ अभियानात विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत २५ लाख तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये १० लाखांचे बक्षीस हिवरे बाजार गावाने पटकावले आहे. असे एकून ३५ लाख रूपयांचा पुरस्कार हिवरे बाजार गावाला मिळाला आहे. नाशिक विभागात हिवरेबाजारला दहा लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अवनखेड (ता.दिंडोरी, जि.नाशिक) गावाला आठ लाखांचे क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाचा चार महिन्यात डीपीआर निघणार व व सात ते आठ महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिली. आदर्शगाव हिवरेबाजारने स्वच्छतेची गरज व त्यातील सातत्य टिकवून ठेवले आहे. १९९२मध्ये ग्राम अभियानात विभागात प्रथम येऊन याची सुरुवात झाली होती. त्यानंतर २००० मध्ये दिवंगत ग्रामविकास मंत्री आर.आर.पाटील यांच्या कल्पनेतून संत गाडगेबाबा अभियान सुरू झाले. त्यात प्रथमच भाग घेताना हिवरे बाजार जिल्ह्यामध्ये प्रथम आले होते. त्यावेळेस गावाला पाच लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर या अभियानात भाग न घेता गाव स्वच्छ ठेवण्याबाबत मात्र गावकऱ्यांनी सातत्य ठेवले होते.

 

 

 

 

 

 

 

First Published on September 6, 2018 6:45 pm

Web Title: clean village award goes to hivre bajar
Just Now!
X