एकीकडे कचऱ्यामुळे काळवंडलेले किनारे स्वच्छ करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांकडून किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जात असताना महापालिका मात्र स्वच्छता मोहिमेदरम्यान गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात अक्षम्य उदासीनता दाखवत आहे. यामुळे किनाऱ्यावर जमा झालेले कचऱ्याचे ढीग पुन्हा भरतीच्या पाण्यामुळे समुद्रकिनारी ढकलले जात आहेत. त्यामुळे स्वच्छता पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वसईच्या पश्चिमेकडील भुईगाव किनाऱ्यावर रविवार काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी किनारा स्वच्छता अभियान राबवले. मात्र, या कचऱ्याची पालिकेने विल्हेवाट न लावल्याने तो पुन्हा किनारी जमा झाला आहे.

वसई-विरार शहर महापालिकेच्या आरोग्य विभागाला या कचऱ्याची माहिती देऊनही महापालिका प्रशासन सुस्त आहे. भरतीच्या वेळेस ढीग लावून ठेवलेला कचरा पुन्हा पाण्यात जात आहे. त्यामुळे कचऱ्यावर दरुगधी पसरली आहे, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. भुईगाव किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबवून चार दिवस उलटले तरी ढिग करून ठेवलेला कचरा उचलण्यासाठी महापालिकेची गाडी आलेली नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

भुईगाव किनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. या भागात महापालिकेकडून कचरापेटय़ा ठेवण्यात आल्या असल्या तरी काही पर्यटक दारूच्या बाटल्या, चॉकलेट्सची वेष्टणे किनाऱ्यावर टाकून देतात.

पर्यावरणासाठी वेळोवेळी स्वच्छता होणे गरजेचे आहे. सफाई कामगारांची कुठेही गरज लागली तरी पालिकातर्फे सफाई कामगार, कचर्?याच्या गाडय़ा पुरवल्या जातात. समुद्र किनार्?यांवर गरज लागल्यास कचरा उचलण्यासाठी पालिका कामगारांना पाठवण्यात येईल.

— वसंत मुकणे, पर्यावरण अधिकारी