25 February 2021

News Flash

८० कोटींचे वीज देयकप्रकरणी लिपिक निलंबित

५० ते ६० हजार वीज देयक येत असताना अचानक कोट्यवधीचे देयक पाहून कुटुंबियांना धक्का बसला.

संग्रहीत

वसई : वसईतील वीज ग्राहकाला चक्क ८० कोटींचे वीज देयक दिल्याप्रकरणी महावितरणाने संबंधित लिपिकाला निलंबित केले आहे. तर सहायक लेखापाल आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर चुकीचे देयक वितरित केल्याप्रकरणी मीटर वाचन घेणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसईच्या निर्मळ येथील सतीश नाईक या भातगिरणी मालकाला महावितरणाने  ७९ कोटी १४ लाख ९६ हजार रुपयांचे वीज देयक पाठविले होते. एरवी ५० ते ६० हजार वीज देयक येत असताना अचानक कोट्यवधीचे देयक पाहून कुटुंबियांना धक्का बसला. नाईक यांचे वडील ८० वर्षांचे असून देयक पाहून त्यांची प्रकृती खालावली होती. ही बातमी प्रसिध्द होताच खळबळ उडाली. मीटर वाचन यंत्रणेत नोंद करताना चूक झाल्याने ८० कोटींचे  देयक तयार झाले होते, असे कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी सांगितले.  देयक दुरुस्ती झाल्याशिवाय ग्राहकांना देऊ नका अशा सूचना  एजन्सीला ही देण्यात आल्या होत्या.   वीज देयक ग्राहकाला दिल्याने गोंधळ झाल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी सतीश नाईक यांच्या वीजदेयकात दुरुस्ती करून त्यांच्या मीटर वाचननुसार ८६ हजार ८९० रुपयांचे सुधारित वीजदेयक मंगळवारी त्यांना घरी नेऊन देण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांना कारणे दाखवा, एजन्सीवर कारवाई

कोट्यवधींचे देयकप्रकरणी लेखा विभागाचे उच्चस्तर लिपिक दीपेंद्र  शिंदे यांना तात्काळ  निलंबित करण्यात आले आहे. तर सहायक लेखापाल आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित रिडींग एजन्सीवर कारवाई करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण यांनी दिल्यानंतर नालासोपारा पोलीस ठाण्यात संबंधित  एजन्सी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती महावितरणने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:26 am

Web Title: clerk suspended in electricity payment case akp 94
Next Stories
1 टँकरमाफियांबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून विचारणा
2 भाडोत्री वाहन कंत्राटात अनियमितता
3 जयंत पाटील यांची खेळी यशस्वी
Just Now!
X