महाराष्ट्रातील जनतेच्या जनजागृतीसाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना दोन टप्प्यात राबवली जाणार आहे. प्रत्येक कुटुंबाची आरोग्य चौकशी केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. ही योजना दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. प्रत्येक कुटुंबाची आरोग्य चौकशी या योजने अंतर्गत केली जाणार आहे.

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला धन्यवाद देत आहे, कारण मी सुरुवातीलाच म्हटले होते की हे करोनाचे संकट म्हणजे विषाणू बरोबरचे आपले युद्ध आहे. या युद्धामध्ये सर्व धर्मीय, सर्व पक्षीय खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे मैदानात उतरले. मधल्या काळामध्ये आपण अधिवेशन कधी घ्यावे, या विषयावर चर्चा केली आणि दोन दिवस अधिवेशन घेण्याचे ठरले. दोन्ही दिवस अत्यंत शांतपणे, शिस्तीने, समजूतदारपणे, सामंजस्याने विरोधी पक्षाने आणि सर्व पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी शासनाला सहकार्य केले, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.”

WHOने संपूर्ण जगाला इशारा दिला आहे की कोरोनाचे संकट लवकर जाईल असे वाटत नाही, पण इशारा हा आहे की पुढच्या अजून मोठ्या महामारीला अधिक सज्जतेने तयार रहा. याचा अर्थ असा की आपल्याला कुठेही शिथिलता किंबहुना गाफील राहून चालणार नाही, प्रत्येक पाऊल समजूतदारपणे व दक्षतेने टाकावे लागणार आहे.