News Flash

‘लिहून घ्या, महाराष्ट्रात विधानसभा लोकसभा निवडणुका एकत्र नाहीत’

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार का? याची बरीच चर्चा सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते महत्त्वाचं आहे. लिहून घ्या महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत, असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे नागपुरात ते बोलत होते. लोकसभेसोबतच महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र या वृत्ताला अर्थ नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यमंत्रिमंडाळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसंच प्रलंबित बाबींवर शासन निर्णयही जारी करण्यात आले. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपुरात यासंबंधी विचारणा केली असता लिहून घ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 7:18 pm

Web Title: cm devendra fadanvis refused possibility of loksabha and assembly election together in maharashtra
Next Stories
1 महाआघाडीत ‘मनसे’?, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणतात…
2 मोबाईल खरेदीत १०६ कोटींचा घोटाळा, पंकजा मुंडेंवर धनंजय मुंडेंचा आरोप
3 SSC Exam : हृदयद्रावक! वडिलांच्या पार्थिवाजवळ बसून मुलीने रात्रभर केला अभ्यास
Just Now!
X