काँग्रेसने सत्तेचे दलाल तयार केले, लचके तोडण्यासाठी जनतेने भाजपला सत्ता दिलेली नाही, या शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांग्रेसवर वार केला. कोल्हापूर येथे झालेल्या राज्य भाजपच्या तीन दिवसीय अधिवेशनाचा आज समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते.
काँग्रेसने सत्तेचे दलाल तयार केल आहेत पण आपल्याला सत्तेचे सेवक बनून काम करायचे आहे. सत्तेवर आलो म्हणजे कार्यकर्त्यांची जबाबदारी संपली नाही, याऊलट आता जबाबदारी वाढली आहे, पुढील पाच वर्षांत जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याची मेहनत करा. भाजप कार्यकर्त्यांचे वॉट्स अॅपवर ग्रुप तयार करुन त्यावर सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती पोहोचवावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच, राज्यातील सरकार मजबूत असून शाहू, फुले व आंबेडकरांचा वारसा पुढं नेण्याचं काम करत आहे.  सरकारने शेतक-यांना जाहीर केलेली मदत देण्यास टाळाटाळ करणा-या बँकांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.