स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर नायक की महानायक असा कार्यक्रम करा मी देखील त्या कार्यक्रमात सावरकर महानायकच कसे होते हे सांगण्यासाठी हजर राहिन असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महिन्याभरापूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीने ‘सावरकर नायक की खलनायक?’ हे शीर्षक देऊन एक चर्चात्मक कार्यक्रम सादर केला होता.

या कार्यक्रमानंतर सावरकरांचे विचार मानणाऱ्या प्रत्येकानेच या वृत्तवाहिनीचा आपल्या परिने निषेध नोंदवला. सुरुवातीला नमतं न घेण्याची भूमिका घेतलेल्या या वाहिनीने काही दिवसांनी रितसर माफी मागितली आणि असा कार्यक्रम घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. याच वाहिनीच्या एका सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती.

Karnataka CM Siddaramaiah calls PM Modi nalayak loksabha election 2024
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?
Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; म्हणाले, “नकली शिवसेना म्हणायला ती तुमची डिग्री आहे का?”
cm eknath shinde criticizes uddhav thackeray
उद्धव ठाकरेंची ‘उठ-बस’सेना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; पाठिंब्यासाठी राज यांचे अभिनंदन
narayan rane On uddhav thackeray
“आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

त्यावेळी शालजोडीतले टोमणे मारत या मराठी वृत्तवाहिनीच्या संपादकांना खडे बोल सुनावले. मंचावर जेव्हा ते बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हाच त्यांनी हा विषय काढला आणि सावरकरांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या वाहिनीच्या कार्यक्रमाला तुम्ही का जाता? असा प्रश्न विचारणारी पत्रं आपल्याला आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच याचे उत्तरही मुख्यमंत्र्यांनी दिले, ते म्हणाले मी मनाशी विचार केला. सावरकरांनी कधीही विचारांची लढाई बहिष्काराने केली नाही. आज सावरकर जर असते तर नक्की म्हटले असते की तू या कार्यक्रमाला गेलं पाहिजेस आणि म्हणून मी कार्यक्रमाला आलो आहे.

पुढच्या वर्षी सावरकर जयंतीच्या वेळी सावरकर नायक की महानयाक ही चर्चा घ्या या कार्यक्रमात मीपण सहभागी होईन असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठी माध्यमांमध्ये सावरकरांना अनेक परिक्षांना सामोरं जावं लागलं. त्या आता माध्यमांनी तरी थांबवाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे. मराठी माणसाला आणि देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात सावरकर हे महानायकच आहेत. त्यामुळे अशा प्रकारे कार्यक्रम झाल्यानंतर इतक्या प्रेमळ जनतेची लगेच माफी मागायलीही हवी होतीत असंही म्हणत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.