विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्ज दाखल केला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी हा अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात येऊन विधान परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे त्यांनी हा अर्ज सोपवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही होत्या. तसंच आदित्य ठाकरेही होते.
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे ५ तर भाजपाचे ४ उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी दोन उमेदवार दिल्याने तिढा निर्माण झाला होता. मात्र तो सुटला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली खरी, मात्र ते विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे सदस्य नव्हते. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. आता २१ मे रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
नऊ रिक्त जागांसाठी निवडणूक, कोणत्या पक्षाचे उमेदवार कोण?
उद्धव ठाकरे-शिवसेना
नीलम गोऱ्हे-शिवसेना
राजेश राठोड-काँग्रेस
राजकिशोर मोदी-काँग्रेस
रणजितसिंह मोहिते पाटील-भाजपा
गोपीचंद पडळकर-भाजपा
प्रवीण दटके- भाजपा
डॉ. अजित गोपचडे-भाजपा
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 12:45 pm