राज्यात दिवसेंदिवस करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यांसंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. मात्र तरी देखील संसर्ग कमी होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारकडून राज्यभरासाठी लॉकडाउनची घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला उद्देशून समाज माध्यमांवरून संबोधित करणार आहेत. आज मुख्यमंत्री नेमका कोणता निर्णय जाहीर करणार? याकडे राज्यभरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज संबोधित करणार असल्याबद्दल सीएमओच्या अधिकृत ट्विट हॅण्डलरवरून माहिती देण्यात आलेली आहे. या अगोदर वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनबाबत इशारा दिलेला होता. मागील काही दिवसांमध्ये त्यांनी तज्ज्ञांसह सर्वपक्षीय बैठक घेत विरोधी पक्षांसह राज्यभरातील नेते मंडळींशी देखील चर्चा केलेली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील सरकारला लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल, असं बोलून दाखवलेलं आहे.

Pimpri, eknath shinde, eknath shinde latest news,
पिंपरी: मुख्यमंत्री आले अन् काहीही न बोलता निघून गेले…
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
The decision to take Eknath Shinde and Ajit Pawar along with them is the BJP leaders in the state
एकनाथ शिंदे,अजित पवार यांना बरोबर घेण्याचा निर्णय राज्यातील भाजप नेत्यांचाच! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा दावा

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्री आजच निर्णय घेतील – अस्लम शेख

लॉकडाउनचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही याला आज दुजोरा दिलेला आहे. “विषाणूची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतोय. लोकांनीही हे समजून घेतलं पाहिजे. एका आठवड्यापासून सरकार प्रयत्न करतोय. पण कुठेही कमतरता दिसत नाही म्हणून मला असं वाटतंय की, राज्य सरकारचा आज यासंदर्भातील मोठा निर्णय घेणार.” असं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.