News Flash

“मराठी भिकारी आहे का?, महाराष्ट्र भिकारी आहे का?, आम्ही काय…”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत संतापले

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात मुख्यमंत्री बोलत होते

(फोटो सौजन्य: स्क्रीनशॉट)

पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या निर्धार बोलून दाखवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडून यासंदर्भात सर्व पूर्तता झाली असून केंद्रानेच हा दर्जा दिलेला नाही असा आरोप केला आहे. विधासनभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणासंदर्भात आभार व्यक्त करताना उद्धव यांनी केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाल नसल्याचे सांगितले. मराठी काय भिकारी आहे का?, महाराष्ट्र भिकारी आहे का? आम्ही काय कटोरा घेऊन दिल्लीच्या दारात उभे आहोत का?, असे प्रश्न उद्धव यांनी विधानसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान उपस्थित केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यापालांचे आभार मानल्यानंतर भाषणामध्ये सर्वात आधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातील निर्णय केंद्राने अडकवून ठेवल्याचा आरोप केला.  “मुख्यमंत्री म्हणून माझ्या कार्यकाळातील दुसरा मराठी भाषा दिन झाला. त्या मराठी भाषादिनानिमित्त आम्ही म्हणत असतो की मराठी भाषेला आम्ही अभिजात भाषेचा दर्जा देऊ. आम्ही म्हणजे कोण देणार आहे?, आपल्याकडून ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व देण्यात आल्या आहेत. आणखीन काही लागल्या तर त्याही देऊ. मात्र अजूनही केंद्राकडून माझ्या या मातृभूमिला तिष्ठत उभं ठेवलं आहे,” असं उद्धव यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना उद्धव यांनी संतापून,”मराठी भिकारी आहे का? महाराष्ट्र भिकारी आहे का? आम्ही काय कटोरा घेऊन त्या दिल्लीच्या दारामध्ये उभे आहोत? छत्रपतींची भाषा भिकारी असू शकत नाही,” असं म्हणताच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी बाकं वाजवून त्यांचं समर्थन केलं.

“तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व म्हणता ते पहिलं हिंदुत्व राज्य स्थापन करणाऱ्या छत्रपतींची ही मातृभाषा आहे. तिच माझी आणि तुमची मातृभाषा आहे. तसेच छत्रपती नसते तर तुमचं आमचं सोडून द्या. दिल्लीत जे बसलेत ते तरी असते का हा पहिला विचार केला पाहिजे आणि ज्या भाषेमुळे आपलं अस्तीत्व आहे, त्या भाषेला तुम्ही तिचा मान द्यायला नाकारात आहात हा करंटेपणा महाराष्ट्र कदापी विसरु शकत नाही. मराठी माती आणि मराठी माता हे विसरु शकत नाही,” अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी केंद्र सरकारमुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रश्न अडकून आल्याचा आरोप केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 4:15 pm

Web Title: cm uddhav slams central government for marathi language issue scsg 91
Next Stories
1 उद्धव ठाकरेंकडून जमीन खरेदी प्रकरणात पदाचा गैरवापर; सोमय्या यांचा गंभीर आरोप
2 समता प्रतिष्ठान आर्थिक घोटाळा प्रकरण : कॅगपासून माहिती लपवणारे ‘ते’ अधिकारी निलंबित
3 ….तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग; मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
Just Now!
X