News Flash

“गर्दी करणारे राजकीय, धार्मिक कार्यक्रम नकोच”, मुख्यमंत्र्यांचं राज्यातील पक्ष-संघटनांना आवाहन

गेल्या काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाल्याचं दिसून येत आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कळकळीची विनंती केली आहे.

Uddhav-Thackeray-8
"गर्दी करणारे राजकीय, धार्मिक कार्यक्रम नकोच", मुख्यमंत्र्यांचं राज्यातील पक्ष-संघटनांना आवाहन (संग्रहित फोटो)

गेल्या काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पक्ष आणि संघटनांना कळकळीची विनंती केली आहे. “मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी  होणारे राजकीय कार्यक्रम, सभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता. मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या.”, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केले आहे.

“राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच  पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू.तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं. “हे उघडा ते उघडा’ या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही.  म्हणूनच माझ्या शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहे, आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करायला हवे. सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

“मला वारंवार आपणांस  हे आवाहन एवढ्याचसाठी करावे लागते आहे, कारण करोना परत वाढतोय.  येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे. दुसऱ्या लाटेची सुरुवात कशी झाली त्याची आपणास पूर्ण कल्पना आहे. या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला देखील यातून जावे लागले होते.,” असंही त्यांनी सांगितलं.

“करोनाने जोरदार धडक द्यायला सुरुवात केलीय. अमेरिकेत तिसऱ्या लाटे जीवन अत्यावस्त केले. चीनही विळख्यात सापडलाय. आपल्या देशातच केरळ राज्यात रोज ३० हजार नवे रुग्ण समोर येत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे व तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतला नाही, तर महाराष्ट्राला जनजीवनाची फार मोठी किंमत चुकवावी लागेल.”, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2021 2:19 pm

Web Title: cm uddhav thackeray appeals to party organizations in the state due corona cases rmt 84
टॅग : Corona,Uddhav Thackeray
Next Stories
1 “हळूहळू संजय राऊत खरं बोलायला लागलेत पण…”; आशिष शेलारांचा टोला
2 “…तेव्हा हे पाहून हेवा वाटला होता”; जयंत पाटलांनी शेअर केली १८ वर्षांपूर्वीची आठवण
3 “काही लोकांचं वक्तव्य….”; जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Just Now!
X