News Flash

लॉकडाउननंतर कोणत्या शहरात काय होणार? वाचा उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

त्यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधला.

संग्रहित छायाचित्र

टाळेबंदी म्हणजे एकप्रकारचा गतीरोधक आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी याच गतीरोधकाचा मोठा उपयोग झाला. जर ही टाळेबंदी लागू केली नसती तर आज करोनाचा गुणाकार मोठ्या प्रमाणात झाला असता. त्यामुळेच ही टाळेबंदी लागू करण्यात आली, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यांनी फेसबुक लाइव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. तर पाहुया उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 • मुख्यमंत्री म्हणून हुतात्म्यांना वंदन करताना मनात आलेल्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही.
 • संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ठाकरे घराण्याचाही सहभाग होता.
 • हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन धुमधडाक्यात साजरा करण्याचं आधी ठरवलं होतं, पण आता नाईलाज आहे.
 • आजही मी तोंडावर मास्क लावून अभिवादन केल.
 • लतादीदींनी २०१० मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी बीकेसीतील मैदानात ‘बहु असोत सुंदर’ गाणे गायल्याची आठवण झाली, आज त्याच जागी कोविड रुग्णांसाठी उपचार केंद्र.
 • ऑक्सिमीटरच्या मदतीने दोन लाख तपासण्या, २७२ जण ऑक्सिजनचं प्रमाण कमी किंवा इतर व्याधी असलेले सापडले.
 • हिंगोलीमध्ये पोलीस जवानांना कोरोनाची लागण. पण सर्व जणांवर विलगीकरण कक्षात उपचार.
 • अद्यापही ७५ ते ८० टक्के रुग्ण सौम्य, अतिसौम्य लक्षणं असलेले, काळजी घेतली नाही तर ते कोरोनाचे वाहक ठरण्याची भीती.
 • लॉकडाउन म्हणजे टाळेबंदी नाही तर गतिरोधक.
 • सिंगापूरच्या पंतप्रधानांनी सर्किट ब्रेकर शब्द वापरला, आपण कोरोनाची साखळी तोडली नसती तर आकडा कितीतरी वाढला असता.
 • बीकेसीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी.
 • मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीच्या महापौरांनी पुन्हा परिचारिका म्हणून काम करण्याची तयारी दाखवली, २० हजार कोविड योद्धे तयार, त्यापैकी १० हजार योद्ध्यांना प्रशिक्षण देत आहोत.
 • २ लाखांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या. ७५ -८० टक्के रुग्णांत सौम्य लक्षणं आहेत.
 • मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये तपासणी सुरू. इतर आजार असलेल्यांची विशेष खबरदारी घेतली जात आहे.
 • फिव्हर क्लिनिकमध्ये वेळेमध्ये या, लक्षणं दिसली तर अंगावर काढू नका.
 • कोरोनाचा रूग्ण लवकर आला तर, लगेच बरा होऊ शकतो.
 • अर्थचक्र रुतलं मान्य, पण तुम्ही सगळे जवान राज्याची संपत्ती.
 • रेड,ऑरेंज आणि ग्रीन झोन, मुंबई आणि परिसर, पुणे आणि आसपासचा भाग, नागपूर, औरंगाबाद हे रेड झोनमध्ये, ऑरेंज झोनमध्ये काळजी, तर ग्रीन झोनमध्ये काही अटी.
 • परराज्यातील मजूर, पर्यटक यांना ने-आण करण्याची व्यवस्था करत आहोत.
 • शेतीवर कोणते ही बंधन नाही, कृषीमालावर काहीही अट नाही, मात्र झुंबड करू नका, अन्यथा पुन्हा बंधन टाकावी लागतील.
 • ३ तारखेनंतर काय करायचं ? नोकऱ्या जाणार, अर्थचक्र रुतलं आहे, हे काही प्रमाणात खरंअसलं तरी प्रत्येक राष्ट्राची खरी संपत्ती ही जनता असते, ती वाचली पाहिजे.
 • कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही, ६ महिन्यांच्या बाळापासून आजीबाईंपर्यंत अनेकजण बरे झाले आहेत.
 • रेड झोनमध्ये कडक नियम पाळावे लागतील. ३ तारखेनंतर प्रत्येक झोनमध्ये मोकळीक देऊ, मात्र घाई-गडबड करू नका, अन्यथा सर्व तपश्चर्या वाया जाईल. पोलीस, डॉक्टर देवासारखे लढत आहेत.
 • आपण हे युद्ध जिंकणारच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 2:53 pm

Web Title: cm uddhav thackeray facebook live coronavirus lockdown maharashtra important points jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Video: याच त्या ८२ वर्षांच्या आजी ज्यांच्या करोनाविरुद्धच्या यशस्वी लढ्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला
2 उद्धव ठाकरे म्हणाले, ३ मेनंतर निर्बंध थोडे शिथील करणार, पण…
3 मनसेचा अभिनव संकल्प! तरुणांना इंपोर्ट- एक्सपोर्ट व डिजिटल मार्केटिंगचे मोफत प्रशिक्षण!
Just Now!
X