News Flash

उद्धव ठाकरे उद्या शिवनेरी गडावरुन करणार शेतकरी कर्जमाफीची घोषणा?

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाचा दौरा आहे

(PTI)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवनेरी गडावर जाणार असून यावेळी सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असणाऱ्या शिवनेरी गडावरुन उद्धव ठाकरे सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा करु शकतात असे संकेत आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाचा दौरा आहे. याशिवाय उद्धव ठाकरे एकवीरा देवीच्या दर्शनालाही जाणार आहेत.

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मी स्वत: शिवनेरीवर जाणार, शिवाय कुलदैवत एकवीरेचंही दर्शन घेणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार उद्धव ठाकरे हा दौरा करणार आहेत.

पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना लवकरच भरीव मदत देणार असल्याचं जाहीर केलं होतं. शेतकऱ्यांना तुटपुंजी नाही तर लवकरच भरीव मदत करण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार असून त्यासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजना व त्यांच्या अंमलबजावणीचा वास्तववादी लेखाजोखा मंत्रिमंडळासमोर सादर करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केले होते.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीच्या महत्त्वाकांक्षी सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी सुमारे ६० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी लागणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारलाही हा निधी कर्जरूपानेच उभारावा लागणार असल्याने सुमारे पावणेपाच लाख कोटी रुपये कर्जाचा बोजा मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 1:24 pm

Web Title: cm uddhav thackeray farmers loan waive shivneri fort mahavikas aghadi sgy 87
Next Stories
1 पंकजा मुंडे, एकनाथ खडसे पक्ष सोडणार का? चंद्रकांत पाटील यांनी दिलं उत्तर
2 पंकजा मुंडेंच्या पोस्टरवरून कमळ गायब! समर्थकांच्या मनात नेमकं काय?
3 कबुतरांचा सांभाळ करत सांगलीचा पठ्ठ्या कमावतोय लाखो रुपये!
Just Now!
X